शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गोरेवाडा जंगलात पुन्हा भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:44 IST

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय परिसरातील इंडियन सफारी भागात सोमवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. या आगीत ४० हेक्टर क्षेत्र जळाले.

ठळक मुद्दे४० हेक्टर क्षेत्र जळालेदोन अग्निशमनच्या गाड्या आणि चार ब्लोवरच्या मदतीने आगीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय परिसरातील इंडियन सफारी भागात सोमवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. या आगीत ४० हेक्टर क्षेत्र जळाले.स्थानिक नागरिकांनुसार ही आग दाभा बायपासकडील सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या वनक्षेत्रात लागली. परंतु दुपारी १२.३० वाजेपर्यंत वन कर्मचाऱ्यांना या आगीची माहिती मिळाली नव्हती. घटनास्थळावरून बराच वेळपर्यंत धूर आणि आगीच्या ज्वाळा निघत असल्याने वन कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर १२.५० वाजता अग्निशमन विभागाला आगीची सूचना देण्यात आली. अग्निशमन विभागाने एक गाडी तातडीने रवाना केली. आगीची भीषणता लक्षात घेता दुपारी १.२७ वाजता दुसरी गाडीही पाठवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. तेव्हापर्यंत जवळपास ४० हेक्टर क्षेत्र जळाले होते. दहा दिवसांपूर्वीसुद्धा गोरेवाडा जंगलातील काटोल रोडवरील परिसरात आग लागली होती. तेव्हा जवळपास १०० हेक्टर क्षेत्र जळाले होते. त्याच्या दोन दिवसांपूर्वीसुद्धा गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील रेस्कू सेंटर परिसरात आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी प्राणिसंग्रहालय पूर्ण होण्यापूर्वीच या परिसरात वारंवार आगीच्या घटना होत असल्याने यामागे काही घातपात तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. या दिशेने वन अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालयfireआग