शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कीटकनाशक तयार करणाऱ्या टोळीविरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कीटकनाशक तयार करून ती बाजारात विकून शासन व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभागाच्या सहायक संचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाचे तंत्र अधिकारी डॉ. योगिराज जुमडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश भद्दड रा. टिळकनगर अंबाझरी, ...

ठळक मुद्देतंत्र अधिकारी डॉ. योगिराज जुमडे यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कीटकनाशक तयार करून ती बाजारात विकून शासन व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभागाच्या सहायक संचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाचे तंत्र अधिकारी डॉ. योगिराज जुमडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश भद्दड रा. टिळकनगर अंबाझरी, असे आरोपीचे नाव आहे. भद्दड याचे लाव्हा खडगाव रोड येथे मे. गोविंद इंटरप्रायजेस आहे. त्यांना कृषी विभागाकडून कीटकनाशक औषध विक्री करण्याचा परवाना आहे. परंतु ते कीटकनाशक तयार करू शकत नाही. असे असताना आरोपी एम.एस. विलो वूड केमिकल प्रा. लि. वडोदरा गुजरात, एम.एस. श्री जी. टेस्टी साईड प्रा. लि. वडोदरा गुजरात यांना बनावट कीटकनाशक औषध तयार करून देण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून दिला. तर बेलगाव उमरेड येथील एम.एस. मेट्रिक्स चेमर्स प्रा. लि. यांनी कुठलाही परवाना नसताना बनावट कीटकनाशकाचे बॉटलिंग करून दिले. या चौघंनी संगनमत करून तयार केलेली क्रिस्टल कॉप्सप्रोटेक्शन लि. या कंपनीची मिसाईल व बॅलेस्टिक हे बनावट कीटकनाशक बाजारात विकून शेतकरी व शासनाची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यावर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी