शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

महाराजा डेव्हलपर्सचेसंचालक डांगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 21:05 IST

बंगलो देण्याच्या नावाखाली अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी उपराजधानीतील बहुचर्चित बिल्डर, महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बिल्डर डांगरे विरोधात कारवाई व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पीडित गुंतवणूकदारांची कायदेशीर लढाई सुरू होती, हे विशेष!

ठळक मुद्देबंगलो घेणाऱ्यांची फसवणूककोट्यवधी रुपये घेतले१३ वर्षांनंतरही दिला नाही ताबा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंगलो देण्याच्या नावाखाली अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी उपराजधानीतील बहुचर्चित बिल्डर, महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बिल्डर डांगरे विरोधात कारवाई व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पीडित गुंतवणूकदारांची कायदेशीर लढाई सुरू होती, हे विशेष!डांगरे यांनी सन २००० मध्ये मौजा चिखली खुर्द येथील खसरा क्र. २७/१, प.ह.क्र. ३९ अ मध्ये ३ हेक्टर आर जमीन दिनकर सीताराम साफळे यांच्याकडून ६७ लाख ५० हजारात खरेदी करण्याचा सौदा केला होता. त्यानंतर २००४ मध्ये शेतमालकाकडून त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतली. २००६ मध्ये डांगरे यांनी चिखली(खुर्द)मध्ये स्वराज पार्क रो-हाऊस-बंगलो स्कीम सुरू केली. केवळ दोन वर्षांत बंगल्याचा ताबा देण्याचा दावा केल्यामुळे स्वत:च्या मालकीच्या निवासस्थानाचे स्वप्न रंगविणाऱ्या ५० पेक्षा जास्त लोकांनी बिल्डर डांगरे यांना (कुणी १० तर कुणी २० लाखांची) अ‍ॅडव्हान्स रक्कम दिली होती. डांगरे यांच्याकडे बंगलो विकत घेण्याच्या नावाखाली अनेकांनी कोट्यवधी रुपये जमा केले होते. त्याला आता १३ वर्षे झाली. मात्र, डांगरे यांच्याकडून निर्माणाधीन बंगल्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर ज्यांनी आपली लाखोंची रक्कम गुंतविली, तीसुद्धा त्यांना परत करण्यात आली नाही. यासंबंधाने गुंतवणूकदारांनी आधी सक्करदरा पोलीस ठाण्यात आणि नंतर पोलीस उपायुक्तांसह अनेक वरिष्ठांकडे वारंवार फसवणुकीच्या तक्रारी केल्या. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तक्रारकर्त्यांचे बयान नोंदवीत होते. मात्र, डांगरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याने स्वत:च्या बंगल्याचे स्वप्न रंगवून डांगरेंकडे लाखो रुपये जमा करणारी मंडळी कमालीची अस्वस्थ झाली होती.ती जमीन आरक्षित!ज्या जागेवर बंगलो देण्याची डांगरेंनी बतावणी केली होती, ती जमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असल्याचे माहीत पडल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. परिणामी ते बिल्डर डांगरे यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, डांगरे त्यांना भेटण्याचे टाळत होते, त्यांना शिवीगाळ करून धमकी देत होते. त्यामुळे घराचे स्वप्न बघणारे गुंतवणूकदार संतप्त झाले होते.लोकमतने उचलला आवाजयासंबंधाने सक्करदरा पोलिसांकडे गुंतवणूकदारांच्या वतीने नत्थूजी वानखेडे यांनी बिल्डर डांगरेंच्या विरोधात तक्रार केली होती. ते आमचा बंगला देत नाही, आमची रक्कमही परत करीत नाही आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देतात, असे तक्रारीत नमूद होते. त्यांच्या या तक्रारीची ठोस दखल घेतली जात नसल्याने गुंतवणूकदारांनी हे प्रकरण लोकमतकडे मांडले होते. १३ वर्षांपासून आम्हाला नुसते झुलविले जात आहे. बिल्डरांसोबत पोलीसही न्याय द्यायला तयार नसल्याची कैफियत रक्कम गुंतविणाऱ्यांनी मांडली होती. लोकमतने फसवणुकीचे हे प्रकरण लावून धरले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशीही संपर्क केला. त्यामुळे सक्करदरा पोलिसांनी प्रदीर्घ चौकशीनंतर गुरुवारी, १० जानेवारीला बिल्डर डांगरे यांच्याविरुद्ध फसवणूक (कलम ४२०) करून शिवीगाळ करणे तसेच धमकी (कलम ५०४, ५०६)देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर डांगरेंना पोलिसांनी अटक केली नव्हती.फसवणुकीचा आकडा ४४.२५ लाखांचापोलिसांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, बिल्डर डांगरे यांनी लोकांकडून ४४ लाख २५ हजार रुपये गोळा केल्याचे सक्करदऱ्यातील गुन्हे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात ही रक्कम कितीतरी पट जास्त असल्याचे संबंधितांचे सांगणे आहे. गुन्हे अहवालात नोंदविलेला हा रकमेचा आकडा १३ वर्षांपूर्वीचा असल्याचे पोलीस सांगतात. त्यावेळचे जमीन मूल्य आणि ती रक्कम तसेच आजचे जमीन मूल्य लक्षात घेतल्यास ही रक्कम १० कोटींच्या वर जाते, असेही पोलीस खासगीत मान्य करतात.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी