लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर येथील माऊंट रोड ते शितला माता मंदिरपर्यंत कुठलीही परवानगी न घेता रस्ता खोदणाऱ्या ओसीडब्ल्यूचे कंत्राटदार आणि इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ओसीडब्ल्यू्च्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.सध्या नागपूर शहरात जागोजागी खड्डे खोदले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. बुधवारी वाहतूक विभाग परिमंडळ सदरचे एएएसआय पृथ्वीराज चव्हाण आणि पोलीस शिपाई अर्जुन हे माऊंट रोडवर गस्त लावत होते. यादरम्यान माऊंट रोड ते शितला माता मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमएच/३१/एफसी/०७१८ क्रमांकाच्य ट्रॅक्टरवाल्या मशीनने खोदकाम केले जात होते. यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी खोदकाम करणाऱ्या नीलेश लोखंडे याला खोदकामाच्या मंजुरीसाठी आवश्यक दस्तावेज दाखवण्यास सांगितले. यावर त्याने ओसीडब्ल्यूच्या मंगळवारी झोनचे इंजिनिअर विक्रांत गणेश नागपुरे यांच्या तोंडी आदेशावरून खोदकाम करीत असल्याचे सांगितले. याप्रकारचे खोदकाम नागरिकांसाठी अपघाताचे मोठे कारण ठरू शकते. यानंतरही खोदकामासाठी शासकीय विभागांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी ओसीडब्ल्यूचे ठेकेदार नीलेश व इंजिनियर विक्रांतविरुद्ध कलम २८३, ३४१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलीस अधिकाऱ्यांसह झाली होती संयुक्त बैठकशहरात जागोजागी खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याला गांभीर्याने घेत २७ मे रोजी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक बोलावली होती. त्यात याविषयावर चर्चा होऊन काही सूचनाही करण्यात आल्या होत्या. परंतु यानंतरही सूचनांचे पालन न झाल्याची बाब समोर आली आहे.
नागपुरात ओसीडब्ल्यूचे कंत्राटदार-इंजिनियरविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:53 IST
सदर येथील माऊंट रोड ते शितला माता मंदिरपर्यंत कुठलीही परवानगी न घेता रस्ता खोदणाऱ्या ओसीडब्ल्यूचे कंत्राटदार आणि इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ओसीडब्ल्यू्च्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागपुरात ओसीडब्ल्यूचे कंत्राटदार-इंजिनियरविरुद्ध गुन्हा दाखल
ठळक मुद्देमंजुरी न घेता रस्त्याचे खोदकाम : कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ