शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी एसटीला हवाय आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 09:50 IST

एसटीला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी तातडीने ३ हजार कोटींची गरज असून पावसाळी अधिवेशनात एसटीला तातडीने ही रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपावसाळी अधिवेशनात अपेक्षा३ हजार कोटी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदयानंद पाईकरावनागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाल्यामुळे एसटी महामंडळ चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर माल वाहतूक, खासगी गाड्यांचे टायर रिमोल्ड करून एसटीने उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. अलीकडेच एसटी बसेसची आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाली आहे. परंतु एसटी महामंडळाला अनेक बाबींची रक्कम द्यावयाची असून एसटी अद्यापही कर्ज बाजारी आहे. एसटीला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी तातडीने ३ हजार कोटींची गरज असून पावसाळी अधिवेशनात एसटीला तातडीने ही रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे.एसटी महामंडळाच्या बसेस लॉकडाऊनच्या काळात बंद होत्या. कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे, असा प्रश्न महामंडळासमोर उभा झाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे विविध सवलतींची असलेली रक्कम मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले. परंतु थातुरमातुर उपाययोजना करून काहीच अर्थ नसून एसटी महामंडळाला सक्षम करण्यासाठी तातडीने ३ हजार कोटी देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)ने मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सध्या एसटी महामंडळाला डिझेलचे जवळपास २५ कोटी देणे आहे. एसटीने खरेदी केलेल्या चेसीसचे पेसे, जुन्या कंत्राटदारांचे पेसे तसेच जुले आणि ऑगस्टच्या वेतनासाठी आणखी ५०० कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे एसटीला तातडीने ३ हजार कोटी रुपये दिल्यास एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती पूर्व पदावर येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटीच प्रवासाचे स्वस्त आणि सुरक्षित माध्यम आहे. त्यामुळे शासनाने एसटीला आर्थिक मदत केल्यास सर्व सामान्यांची लालपरी स्पर्धेच्या युगात टिकणार आहे.तातडीने आर्थिक मदतीची गरज‘इतर राज्याप्रमाणे शासनाने एसटी महामंडळाला अर्थसाहाय्य देण्यासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. एसटीची आर्थिक स्थिती समजून महाराष्ट्र शासनाने तातडीने एसटीला ३ हजार कोटी द्यावेत.’-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

 

टॅग्स :state transportएसटी