शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांकडून आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 22:41 IST

आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मुकेश नेताम यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डीगांबर चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासनात समन्वय साधून विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा निधी मिळवून दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महाविद्यालयीन शैक्षणिक खर्चासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह योजना लागू करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या शिफारशीनुसार वसतिगृहातर्फे खर्चाची देयके विद्यार्थ्यांनी सादर केल्यास विभागातर्फे देयकाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्यात येते. परंतु महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शिफारसपत्र देण्यास अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह योजना राबविली जाते. त्या आधारे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वसतिगृहात प्रवेश दिला जातो. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन खर्च जसे शैक्षणिक सहल, लघुशोध निबंध अहवाल, राष्ट्रीय ग्रामीण शिबिर, गणवेश यासाठी विद्यार्थ्यांचा जो खर्च होतो. त्या खर्चाचा परतावा आदिवासी विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी महाविद्यालयाकडून शिफारसपत्राची गरज असते. परंतु महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिफारसपत्र देण्यासाठी अडवणूक करीत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत अशाच प्रकारची अडवणूक करण्यात येत होती. शासननिर्णय असतानाही गेल्या ९ वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात होते. यासंदर्भात आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मुकेश नेताम यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डीगांबर चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासनात समन्वय साधून विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा निधी मिळवून दिला. यावेळी भूषण श्रीरामे, मंगेश इवनाते, प्रवीण कलगे, सूर्यभान श्रीरामे, भूषण जुगनाके, विशाल ताराम, कार्तिक मडावी, देवराज बागडेरिया आदी विद्यार्थी उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी चव्हाण यांनी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना यापुढे असा प्रकार झाल्यास विद्यापीठाला अवगत करून सर्व आदिवासी विद्यार्थांना इतरत्र महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल, असा इशारा दिला.

टॅग्स :Studentविद्यार्थीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना