शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासन पूर्तीच्या संकल्पाला आर्थिक ब्रेक

By admin | Updated: October 5, 2016 03:04 IST

महापालिकेत मागील दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. निवडणुका विचारात घेता सत्तारुढ भाजप नेतृत्वातील नागपूर

महापालिका : शहरातील विकास कामांवर परिणाम गणेश हूड ल्ल नागपूरमहापालिकेत मागील दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. निवडणुका विचारात घेता सत्तारुढ भाजप नेतृत्वातील नागपूर विकास आघाडीने वर्षभरापूर्वी गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा ‘संकल्प’ केला होता. याचा विचार करूनच महापालिकेचा सन २०१६-१७ या वर्षाचा २०४८.१३ कोटींचा अर्थसकल्प सादर करण्यात आला होता. परंतु अपेक्षित महसूल जमा न झाल्याने आश्वासन पूर्तीच्या संकल्पाला ब्रेक लागला आहे. वित्त वर्षाच्या अपेक्षित उत्पन्नात स्थानिक संस्था कर व जकात करापासून प्रलंबित येणे, मुद्रांक शुल्क व शासन सहायक अनुदानापासून ७३५ कोटी, मालमत्ता करापासून ३०६.४५ कोटी, पाणीपट्टीतून १५० कोटी, नगररचना विभाग १०१.८५ कोटी, बाजार विभाग ७.५५ कोटी, स्थावर विभाग व जाहिरातीपासून १० कोटी, प्रस्तावित कर्जापासून १०० कोटी, महसुली व भांडवली अनुदान स्वरुपात ३३३.६२ कोटी, इतर बाबींपासून २५.५८ कोटी, स्थानिक केबल आॅपरेटरकडून शुल्क स्वरूपात ५ कोटी सिमेंट रस्त्यांसाठी नासुप्र व राज्य सरकारकडून २०० कोटींच्या अनुदानाचा समावेश आहे. महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेल्या महसुलाचा विचार करता सप्टेंबरपर्यंत एलबीटी पासून ५०३ कोटींचा महसूल जमा झाला. यात शासकीय अनुदानाचाही समावेश आहे. मालमत्ता करापासून १९० कोटी जमा झाले. पाणीपट्टीने १२० कोटींचा आकडा पार केलेला नाही. नगररचना विभागाकडून ७० कोटींचाच महसूल जमा झाला. इतर मार्गाने येणारे उत्पन्न गृहीत धरूनही १ हजार कोटींचा आकडा पार झालेला नाही. मार्च २०१७ पर्यंत अपेक्षित महसूल जमा होण्याची शक्यता कमी आहे. विकास प्रकल्पांना फटका महापालिकेची र्आिर्थक स्थिती चांगली नसल्याने प्रधानमंत्री आवास योजना, शहरबस वाहतूक सक्षम करणे, शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण,बाजार संकुलाचे निर्माण, उद्यानांचा विकास, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, लंडनस्ट्रीट, घनकचरा व्यवस्थापन, महिलांसाठी शौचालय, सुलभ शौचालये, श्रीमंत राजे रघुजी भोसले सभागृहाचे नवीन बांधकाम,नगरभवन सभागृहाचे बांधकाम, कविवर्य सुरेश भट सभागृह, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सिमेंट रस्त्यांचा प्रकल्प तसेच शहर विकास योजनेतील प्रस्तावित प्रकल्पांना फटका बसला आहे.