शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिल न स्वीकारण्याचा वित्त विभागाचा फतवा : नागपूर मनपा कंत्राटदारात रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:17 IST

आर्थिक वर्ष संपत असल्याने ३१ मार्चपर्यंत विभागातील प्रलंबित बिल सादर करण्याची प्रथा आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या वित्त विभागाने २३ मार्चनंतर कोणत्याही प्रकारची बिले न स्वीकारण्याचा अफलातून फतवा काढला आहे.

ठळक मुद्देआंदोलन तीव्र करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक वर्ष संपत असल्याने ३१ मार्चपर्यंत विभागातील प्रलंबित बिल सादर करण्याची प्रथा आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या वित्त विभागाने २३ मार्चनंतर कोणत्याही प्रकारची बिले न स्वीकारण्याचा अफलातून फतवा काढला आहे. याबाबतचे पत्र कार्यकारी अभियंता यांना मिळाल्यानंतर दोन दिवस शिल्लक होते. ही वेळ निघून गेल्याने अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. वित्त विभागाच्या मनमानी कारभारामुळे कंत्राटारांसोबतच अधिकारीही नाराज आहेत. कंत्राटदार याविरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्चला प्रभारी वित्त अधिकारी मोना ठाकूर यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे पत्र काढण्यात आले आहे. २३ मार्चपर्यंतच बिले स्वीकारली जातील, असा स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. हे पत्र कार्यकारी अभियंता यांना २१ मार्चला मिळाले. याबाबतची माहिती कनिष्ठ अधिकाºयांना देण्यातच दोन दिवसांचा कालावधी निघून गेला.सोमवारी कंत्राटदार बिल सादर करण्यासाठी वित्त विभागात गेले असता, त्यांना या पत्राची प्रत देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व महापालिका आयुक्त अश्विन मुदगल मुंबईला बैठकीसाठी गेले असल्याने, कंत्राटदारांना त्यांना भेटता आले नाही.मागील अनेक वर्षांपासून आम्ही महापालिकेत काम करीत आहोत. परंतु मार्चअखेरीस अशा स्वरूपाचा फतवा वित्त विभागाने कधी काढला नव्हता, अशी माहिती महापालिका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांनी सांगितले. या आदेशामुळे कंत्राटदारांना संकटात टाकले आहे. २५० कोटींची बिले थकीत असून बिल स्वीकारले नाही तर कंत्राटदारांपुढे गंभीर संकट उभे ठाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्तांची दिशाभूलयासंदर्भात आयुक्तांना कल्पना दिली असता वित्त अधिकाºयांनी त्यांची दिशाभूल केली. विभागाने काढलेले पत्र ही अंतर्गत बाब असल्याचे वित्त अधिकारी मोना ठाकूर यांनी त्यांना सांगितले. या पत्राशी कंत्राटदारांचा कोणताही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु वस्तुस्थिती वेगळी असल्याचे नायडू यांनी सांगितले.मुद्रांक शुल्कात कपातमार्च महिना महापालिकेसाठी आर्थिक संकटाचा ठरला आहे. जीएसटी अनुदान ५१.३६ कोटीहून २७.८१ कोटीवर आणले तर मुद्रांक शुल्काचे महापालिकेला २७ कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील १४ कोटी सेस म्हणून कपात करण्यात आले आहे. यामुळे महापालिकेच्या आर्थिक संकटात भर पडली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर