शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

अखेर नागपुरातील झाडे घेऊ लागली मोकळा श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 11:35 PM

सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ‘डी-चोकींग’च्या कामाला वेग आला आहे. अनेक झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी केल्याने झाडे आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.

ठळक मुद्देआयुक्तांच्या आदेशानंतर ‘डी-चोकींग’ला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्तअभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ‘डी-चोकींग’च्या कामाला वेग आला आहे. अनेक झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी केल्याने झाडे आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.सिमेंट रस्त्यांची कामे करताना रस्त्यालगत असलेल्या बहुतांश झाडांच्या बुध्याभोवती कंत्राटदाराने सिमेंटचे आवरण केले होते. यामुळे झाडांना पाणी टाकता येत नव्हते. मुळांना पाणी मिळत नसल्याने झाडांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अनेक झाडे मरणासन्न अवस्थेत यायला लागली होती. यासंदर्भात शहरात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने संस्थेचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अभिजित बांगर यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. नागपुरातील झाडांमुळे ‘ग्रीन सिटी’ म्हणून शहराची ओळख आहे. मात्र, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे ही ओळख मिटण्याची शक्यता निर्माण झाली होती.सिमेंट काँक्रिटने झाडांचे बुंधे बांधल्या गेल्याने जमिनीखालील मुळांवर त्याचा परिणाम जाणवू लागला होता. याची दखल घेत आयुक्तांनी सर्व झोन आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. २३ मे पर्यंत ही सर्व झाडे मोकळी करण्यात यावी, झाडांच्या बुंध्यांच्या बाजूला ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे तांत्रिक सहकार्य घेऊन जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी आणि प्रत्येक सोमवारी याबबतचा अहवाल मांडण्यात यावा, असेही निर्देश दिले होते. त्यानुसार शहरातील सिमेंट रस्त्यांनी वेढलेल्या झाडांना मोकळे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवतीचे सिमेंट आवरण काढून झाडांचा बुंधा मोकळा करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्तAbhijit Bangarअभिजित बांगर