शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अखेरीस विदर्भात बरसल्या जलधारा; शेतकरीवर्ग सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:58 IST

Nagpur News संपूर्ण जून महिना प्रतिक्षेत गेल्यानंतर बुधवारी रात्रीपासून नागपूर व विदर्भात पावसाला सुरूवात झाली. रोवणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: संपूर्ण जून महिना प्रतिक्षेत गेल्यानंतर बुधवारी रात्रीपासून नागपूर व विदर्भात पावसाला सुरूवात झाली. रोवणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र या पावसाने धानाच्या पºह्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रात्रभरापासून सुरू असलेल्या व सौम्य स्वरुपात कोसळणाºया पावसाने नंतर पहाटे तीव्र रूप धारण केले. नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.उन्ह चांगले तापत असल्याने कोवळी पिके माना टाकत असल्याने शेतकरी घायकुली आला होता. पण बुधवारला विजेच्या कठाक्यात आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अमृतधारा बरल्याने शेतकरी आनंदून गेला. पिकांना संजिवनी मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने समाधान व्यक्त करण्यात आले असून सकाळी थांबलेला पावसाने परत सुरूवात केली आहे.

     दोन आठवड्यापासून पावसाने उघाड दिली होती. सेवाग्राम आणि परिसरातील शेतकरी नव्हे तर नागरिकही असह्य उन्ह आणि गर्मीमुळे त्रस्त झाले होते.घामाच्या धारा वाहत असल्याने‌ पावसाकडे लक्ष लागले होते. पाऊस पडावा यासाठी देवाला‌ साकडे घालण्यात आले. डी धोंडी पाणी दे असेही म्हणत काही गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. सर्वांचेच लक्ष‌ आभाळाकडे लागले होते.शेतकऱ्यांनी‌ तर दुबार पेरणी करावी‌ लागणार‌ याची चिंता लागली‌ होती. यातून आर्थिक घडी नक्कीच विस्कटविणारी होती.नागपूर प्रादेशिक केंद्राच्या हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. सकाळी साडेसात वाजतापासून नागपुरात आलेला पाऊस नऊ वाजेपर्यंत सुरू होता त्यानंतरही पावसाची उघडीप सुरूच आहे. शहराच्या अनेक भागात रिमझिम पाऊस येत आहे. नागपूर ग्रामीणमध्ये सर्व तालुक्यात पाऊस पडला, यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचा आनंद शेतकऱ्यांना आहे.

 मागील 24 तासात गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. गोंदिया जिल्ह्यात 48 मिलिमीटर तर वर्धा जिल्ह्यात 23 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. यासोबतच नागपूर जिल्ह्यातही गुरुवारी सकाळपर्यंत 10.5 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस