शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महानायकाचे झाले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:32 IST

हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नागपुरात आलेल्या अमिताभ बच्चन यांचे अखेर शुक्रवारी चाहत्यांना दर्शन झाले. चित्रीकरणाच्या स्थळावर किंवा हॉटेलमधून येताना-जाताना बच्चन दिसले नव्हते. मात्र शुक्रवारी चित्रीकरणस्थळी जात असताना प्रवेशद्वारावर गाडीत बसलेल्या अमिताभ बच्चन यांची एक ‘झलक’ दिसताच चाहते आनंदित झाले.

ठळक मुद्दे‘झलक’ दिसताच चाहते आनंदित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नागपुरात आलेल्या अमिताभ बच्चन यांचे अखेर शुक्रवारी चाहत्यांना दर्शन झाले. चित्रीकरणाच्या स्थळावर किंवा हॉटेलमधून येताना-जाताना बच्चन दिसले नव्हते. मात्र शुक्रवारी चित्रीकरणस्थळी जात असताना प्रवेशद्वारावर गाडीत बसलेल्या अमिताभ बच्चन यांची एक ‘झलक’ दिसताच चाहते आनंदित झाले. 

नागराज मंजुळे दिग्दर्शन करत असलेल्या ‘झुंड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मागील पाच दिवसांपासून बच्चन नागपुरात आहेत. दररोज चित्रीकरणाच्या स्थळी त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे तेथे पोहोचणे शक्य होत नसल्याने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. शुक्रवारी सकाळी चित्रीकरणाच्या स्थळी पोहोचलेल्या कारच्या काफिल्यांमध्ये एमएच-१२, एनडब्लू ६५६५ या गाडीत बच्चन बसले होते. त्यांना पाहताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मोहननगर परिसरातील शाळेत ‘सेट’ बनविण्यात आला आहे. मात्र सुरक्षेमुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील ‘बिग बी’ यांना पाहता आले नव्हते. शुक्रवारी मात्र दिग्दर्शकांनी पुढाकार घेतला व शाळेच्या काही विद्यार्थ्यांना अमिताभ यांना भेटता आले. त्यांनी यावेळी मुलांशी हातदेखील मिळविला. 

 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनnagpurनागपूर