शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अखेर नागपूर जिल्हा परिषद प्रशासकाच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:22 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य शासनाने सव्वादोन वर्षांअगोदरच कार्यकाळ संंपलेल्या नागपूर जिल्हा परिषदेला अखेर बरखास्त केले आहे. यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी आता पाऊल उचलले जाणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तीन वेळा आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या.

ठळक मुद्देसव्वादोन वर्षे मिळाली सत्ताधाऱ्यांना सत्ता : तीन वेळा झाल्या आरक्षणाच्या सोडती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य शासनाने सव्वादोन वर्षांअगोदरच कार्यकाळ संंपलेल्या नागपूर जिल्हा परिषदेला अखेर बरखास्त केले आहे. यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी आता पाऊल उचलले जाणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तीन वेळा आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या.नागपूर जिल्हा परिषदेत एकूण ५८ सदस्य आहेत. २१ मार्च २०१७ रोजी नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला होता. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण सोडत काढून ‘सर्कल’ गणना केली. आरक्षण सोडतीत आरक्षणाची टक्केवारी ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा आष्टनकर यांनी आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावेळी न्यायालयाने निवडणूक कार्यक्रमावरच स्थगिती आणली होती. यानंतर सरकारने सत्ताधाऱ्यांना मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारने मागे घेतली असून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.सरकारने प्रशासक नियुक्तीला फार उशीर केला आहे. सरकारने दिलेली मुदतवाढ नियमबाह्य होती. त्यामुळे अडीच वर्ष सत्तेचा उपभोग घेण्यावर झालेला खर्च सरकारने जिल्हा परिषदेला द्यावा. अन्यथा ज्यांनी सत्ता भोगली त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी याचिकाकर्ते बाबा आष्टनकर यांनी केली आहे. सद्यस्थितीत ‘सीईओ’ संजय यादव हे जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.विधानसभेनंतर होणार जि.प.निवडणुका ?जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता कधी होणार याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकांअगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्याव्या अशी मागणी शरद डोणेकर यांनी केली आहे. परंतु विधानसभेच्या अगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेणे सत्ताधाºयांना परवडणारे नाही. त्यामुळे साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या आसपास या निवडणुका होऊ शकतात, असा कयास राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.असे होते पक्षीय बलाबलपक्ष                     सदस्य संख्याभाजपा               २१कॉंग्रेस               २०राष्ट्रवादी कॉंग्रेस ७शिवसेना           ८गोंडवाना गणतंत्र पक्ष १अपक्ष                     १

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर