शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अखेर नागपुरातील चिमुकलीचा अपहरणकर्ता जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:09 IST

चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवणे (रा. लाकडीपूल, हत्तीनाला) नामक चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर सहाव्या दिवशी लकडगंज पोलिसांनी यश मिळवले.

ठळक मुद्देपोलिसांनी खरबीत बांधल्या मुसक्या : आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवणे (रा. लाकडीपूल, हत्तीनाला) नामक चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर सहाव्या दिवशी लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. खामदेव श्रीधर मेंडूलकर (वय ३७) असे आरोपीचे नाव असून, तो नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगर, खरबी परिसरात राहतो.मनपाच्या महाल झोन कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या अरुण सारवणे यांच्या श्रद्धा नामक चिमुकलीचे बुधवारी १४ मार्चला दुपारी ४.३० च्या सुमारास अपहरण झाले होते. ती तिचा चुलतभाऊ यशसोबत खेळत असताना लुनावर आलेल्या आरोपीने कबुतर दाखविण्याच्या बहाण्याने श्रद्धाला दुचाकीवर बसवले आणि पळून गेला. यशने घरी गेल्यानंतर श्रद्धाच्या आईला ही घटना सांगितली. त्यानंतर सारवणे दाम्पत्याने लकडगंज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. लकडगंज तसेच गुन्हे शाखेची पथके चिमुकलीला शोधत असताना ती मेडिकलमधील वॉर्ड क्र. ३४ मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुखरूप असलेल्या श्रद्धाला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र तिचे अपहरण करणारा आरोपी मोकाट होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी जागोजागचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत असला तरी तो रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याने त्याची ओळख पटविणे कठीण झाले होते. पोलिसांनी अपहरणकर्त्याचा फोटो लकडगंजच्या लाकडीपुलापासून तो मेडिकलपर्यंतच्या मार्गावर अनेकांना दाखवला, मात्र त्याची ओळख कुणीही पटवली नाही. परिणामी पोलिसांनी त्याला हुडकून काढण्यासाठी लाकडीपूल ते मेडिकल आणि नंतर आरोपी ज्या मार्गाने निघून गेला त्या मार्गावरचे सीसीटीव्ही तपासले. त्यात तो हसनबागकडे जात असल्याचे आढळले. या भागात विचारणा केली असता, सर्वाधिक लुना खरबी परिसरात असल्याचेही पोलिसांना कळले. त्यावरून पोलिसांनी आरोपीसोबत लुनाचीही माहिती विचारणे सुरू केले.आरोपीचा धूर्तपणाआरोपी खामदेव मेंडूलकर विवाहित आहे. त्याला एक १० वर्षांचा मुलगा आहे. तो सलूनच्या दुकानात काम करतो. धूर्त असलेल्या आरोपीने अपहरणाचे वृत्त वाचतानाच आरोपी लुनावर आला होता, असेही वृत्तपत्रात वाचले. त्यामुळे त्याने दुसऱ्या  दिवशीपासून लुना वापरणेच बंद केले. तो पायीच घरी जाणे-येणे करू लागला. मात्र, लकडगंज पोलिसांना त्याचे छायाचित्र मिळाले होते. त्यामुळे हसनबागजवळच्या खरबी चौकात पोलिसांनी जाळे पसरवले होते. सोमवारी रात्री ७ च्या सुमारास आरोपी खामदेव मेंडूलकर पायी जाताना पोलिसांना दिसला. सीसीटीव्हीतील छायाचित्राशी त्याचा चेहरा पुरता जुळत असल्याने पोलिसांनी त्याला जेरबंद करून लकडगंज ठाण्यात नेले. तेथे त्याला बोलते केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या नशेत आपण चिमुकल्या श्रद्धाचे अपहरण केले, असे तो सांगतो. त्याने कोणत्या उद्देशाने अपहरण केले, त्याची कबुली देण्यास टाळाटाळ चालवली आहे. रात्री उशिरापर्यंत ठाणेदार संतोष खांडेकर आणि त्यांचे सहकारी आरोपीची चौकशी करीत होते.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर