शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धारीवाल कंपनीचे पाय जमिनीवर, चूक झाल्याचे केले मान्य; शेतकरी हितासाठी उपाययोजना करण्याची दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:45 IST

Nagpur : हायकोर्टाच्या दणक्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील पॉवरस्टेशनच्या पाणी पाईपलाईनमुळे दरवर्षी लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे पाय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचा दणका बसल्यानंतर जमिनीवर आले. कंपनीने बुधवारी त्यांची चूक झाल्याचे मान्य करून शेतकरी हिताकरिता आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

यासंदर्भात अंतुर्ला येथील अशोक कौरासे व इतर चार पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व तृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

दरम्यान, चंद्रपूर जिल्हाधिकारी व धारीवाल कंपनीने या प्रकरणातील मुद्यांवर १८ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सात आदेशांची माहिती सादर केली तसेच, धारीवाल कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे काटेकोर पालन केले जाईल, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी याचिकेवर येत्या २९ एप्रिलला पुढील सुनावणी निश्चित केली.

प्रामाणिकतेसाठी जमा केले ५० लाखगेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकील अॅड. शिल्पा गिरटकर यांनी रेकॉर्डवरील विविध मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधून धारीवाल कंपनी जबाबदारीने वागत नसल्याचा आरोप केला होता. त्यात प्रथमदृष्ट्या तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने धारीवाल कंपनीला स्वतःची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंपनीने ही रक्कम न्यायालयात जमा केली आहे. त्याची पावती बुधवारी न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर करण्यात आली.

असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • धारीवाल कंपनीने पाईपलाईनची १ दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी शिवधुऱ्यावर नऊ महिन्यांत कच्चा रस्ता तयार करावा.
  • सध्या होत असलेली पाईपलाईनची गळती प्रशासकीय प्रतिनिधी व पीडित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दुरुस्त करण्यात यावी.
  • पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी विशेष यंत्रणा सतत सक्रिय ठेवावी. भविष्यात गळती झाल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी.
  • पाणी गळतीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी व्हॅटव्हालखाली सिमेंटचे टाके तयार करावे. शेतपिकांची काळजी घ्यावी.
  • संयुक्त समितीच्या अहवालानुसार शेतपिकांच्या नुकसानीचा मोबदला तत्काळ पीडित शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा.
  • खासगी शेतीमधील पाईपलाईन काढून ती शिवधुऱ्यावरून दोन मीटर खोलात टाकावी. हे काम १५ महिन्यांत पूर्ण करावे.
  • सरकारी जमिनीवर पाईपलाईन टाकण्यात आल्याने सरकारकडे दरवर्षी ३ लाख ३७ हजार ५९३ रुपये शुल्क जमा करावे.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय