शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जीवनमरणाच्या लढाईत अखेर जंगली कबुतर जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:37 IST

वेळ सायंकाळची. सर्वांनाच घरी परतण्याची घाई झालेली. माणसांना अन् पशुपक्ष्यांनाही..! याच सायंप्रकाशात घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यातील एका कबुतराचे पंख झाड आणि विजेच्या तारांदरम्यान लोंबळकणाऱ्या मांज्यात अडकले. त्याची फडफड ऐकून सोबतचे पक्षी काही क्षण थबकलेही, पण पुन्हा मार्गस्थ झाले. माणसांना तरी त्या इवल्याशा जीवासाठी थांबण्याची कुठे उसंत? तब्बल तास-दोन तास चाललेल्या जगण्यामरण्याच्या संघर्षाची कणव टेलिकॉम नगरातील दोन युवकांना आली. मनपाच्या अग्निशामक विभागाच्या मदतीने तब्बल तीन तासानंतर त्याला खाली उतरवून मुक्त केले. माणसांच्या पतंगबाजीमुळे मृत्यूच्या दाढेत फसलेला हा निरपराध जीव सुदैवाने वाचला अन् आपल्या चिल्यापिल्यांना भेटण्यासाठी घरट्याकडे झेपावला.

ठळक मुद्देनायलॉन मांज्यात फसला होता जीव : ३५ फूट उंचीवरून वाचविले युवकांनी प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेळ सायंकाळची. सर्वांनाच घरी परतण्याची घाई झालेली. माणसांना अन् पशुपक्ष्यांनाही..! याच सायंप्रकाशात घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यातील एका कबुतराचे पंख झाड आणि विजेच्या तारांदरम्यान लोंबळकणाऱ्या मांज्यात अडकले. त्याची फडफड ऐकून सोबतचे पक्षी काही क्षण थबकलेही, पण पुन्हा मार्गस्थ झाले. माणसांना तरी त्या इवल्याशा जीवासाठी थांबण्याची कुठे उसंत? तब्बल तास-दोन तास चाललेल्या जगण्यामरण्याच्या संघर्षाची कणव टेलिकॉम नगरातील दोन युवकांना आली. मनपाच्या अग्निशामक विभागाच्या मदतीने तब्बल तीन तासानंतर त्याला खाली उतरवून मुक्त केले. माणसांच्या पतंगबाजीमुळे मृत्यूच्या दाढेत फसलेला हा निरपराध जीव सुदैवाने वाचला अन् आपल्या चिल्यापिल्यांना भेटण्यासाठी घरट्याकडे झेपावला.नागपुरातील टेलिकॉम नगरातील ही घटना. झाले असे, या परिसरात जवळपास ३० ते ३५ फूट उंचीचे कडूलिंबाचे झाड आणि उंच इमारत आहे. या दोहोंमध्ये असलेल्या विजेच्या तारेवर लटकलेल्या नायलॉन मांजामध्ये १७ जुलैच्या सायंकाळी एक जंगली कबुतर घरट्यात परतण्याच्या वेळी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अडकले. जवळपास अर्धा तास त्याने स्वत:ला सोडविण्याचा प्रयत्न केला. पण मुक्त होण्याऐवजी ते अधिकच गुंतत गेले. जमिनीपासून सुमार ३५ फू ट अंतरावर त्याची ही धडपड सुरू होती. हा सर्व प्रकार मार्गावरून जाणाऱ्या अनेकांनी बघितला. कुणी कळवळा व्यक्त केला; तर कुणी अरेरे.. बिच्चारे.. म्हणत पुढचा रस्ता धरला.ही बाब याच परिसरात राहणाऱ्या सिद्धेश नाजपांडे आणि सचिन द्रवेकर यांना कळली. त्यांनी झाडावर चढून, बांबूच्या साहाय्याने तसेच पतंग उडवून कबुतराला सोडविण्याचा तासभर प्रयत्न केला. मात्र यश येत नव्हते. अशातच वेळ निघत चाललेली. अखेर नरेंद्र नगरातील महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी पाचारण केले. कौतुकास्पद बाब म्हणजे मनपाच्या अग्निशमन विभागाची चमू वेळ न दवडता पोहचली. सिद्धेश नाजपांडे, सचिन द्रवेकर आणि अग्निशमन विभागाच्या चमूतील दत्तात्राय भोकरे, आशु आदमने, सोपान शेंबेकर, ऋषिकेश हाडके यांंनी पुन्हा तासभर विविध उपाय करून बघितले. अखेर गिरगोटच्या साहाय्याने मांज्यापर्यंत पोहचण्यात त्यांना यश आले.नायलॉन मांजा कबुतराच्या संपूर्ण पंखावर आणि गळ्यावर एवढा गुंतला होता की पुन्हा थोडा वेळ झाला असता तर त्याचा गळा कापला असता. कात्रीने मांजा कापून त्याची सुटका केली. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला मुक्त करण्यात आले. माणसांच्या पतंगबाजीच्या छंदापायी या कबुतराच्या आयुष्याचा दोर या दोन युवकांनी वाचविला.

टॅग्स :nagpurनागपूर