शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

अंतिम झालेला आदेश बदलता येत नाही - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 05:50 IST

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १३ मार्च २००७ रोजी अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक ममता हेडाऊ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून महिला कर्मचाऱ्याच्या नोकरीला मिळालेले संरक्षण कायम ठेवले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व ऊर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १३ मार्च २००७ रोजी अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक ममता हेडाऊ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. १९ ऑगस्ट २०१३ ला उच्च न्यायालयाने अनुसूचित जमातीच्या लाभांचा त्याग करण्याच्या अटीवर हेडाऊ यांच्या नोकरीला संरक्षण  दिले. त्याविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले नाही. त्यामुळे त्या आदेशाला अंतिम स्वरुप प्राप्त झाले. त्यानंतर ६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रकरणावरील निर्णयामध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम ठेवले जाऊ शकत नाही, असे जाहीर केले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २० नोव्हेंबर २०१९ रोजी हेडाऊ यांना बडतर्फीची नोटीस जारी केली होती. परिणामी, हेडाऊ यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय