शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'त्या'च नावाने भरा उमेदवारी अर्ज; विवाहित महिलांसाठी आयोगाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत २०२५ साठी विवाहित महिला उमेदवारांनी विवाहापूर्वीचे किंवा विवाहानंतरच्या नावांपैकी कोणते ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत २०२५ साठी विवाहित महिला उमेदवारांनी विवाहापूर्वीचे किंवा विवाहानंतरच्या नावांपैकी कोणते नाव उमेदवारी अर्जावर नमूद करावे, याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करताना विवाहित महिला उमेदवारांना मतदार यादीमध्ये असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे.

यासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवाहित महिला उमेदवारास मतदार यादीमध्ये व नामनिर्देशनपत्रामध्ये नमूद असलेल्या नावाखेरीज मतपत्रिकेवर इतर नावाचा उल्लेख करावयाचा असल्यास उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी तसा विनंती अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल.ज्या नावाचा उल्लेख मतपत्रिकेवर करावयाचा आहे. त्याच्या पुष्ठर्थ आवश्यक पुरावे (विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्रात प्रसिद्ध केलेले विवाहानंतरचे नाव) सादर करणे अनिवार्य आहे. असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

नाव बदलायचे असेल तर...१ विवाहित महिला उमेदवारांकडे वरील प्रमाणपत्र तसेच राजपत्र उपलब्ध नसल्यास मतदाराने मतदान करण्यापूर्वी आपली ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे ८ नोव्हेंबर २०११ रोजीच्या आदेशात नमूद केलेल्या १७पुराव्यांपैकी छायाचित्र असलेला कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक राहील.२ विवाहित महिलांना विवाहापूर्वी व विवाहानंतरचे दोन्ही नावे मतपत्रिकेवर जोडून छापण्याची विनंती केल्यास अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करताना मतदार यादीतील नावापुढे विवाहानंतरचे किंवा पूर्वीचे नाव देखील कंसात छापण्याची परवानगी दिली जाईल. ईव्हीएममध्ये नाव मुद्रित करण्यासाठी असलेल्या जागेचाच व विहित फाँटचा वापर होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Married Women: Use Voter List Name for Election Nomination, Says Commission

Web Summary : Married women must use their voter list name on nomination forms. If a different name is desired on the ballot, submit a request with proof before the deadline. Alternative ID is acceptable if name change documents are unavailable. Both names can appear in candidate lists.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५