शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

आठवडाभरात खड्डे बुजवा; अन्यथा कारवाई : मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 8:16 PM

शहरातील रस्त्यांवरील खड्डे एक आठवड्यात बुजवून त्याचा अहवाल द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणारप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानपालिका हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही मनपाचीच आहे. खड्डे पडले की ते तातडीने बुजविणे हे यंत्रणेचे काम आहे. जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. या कर्तव्यात कुठलीही कसूर खपवून घेणार नाही. शहरातील रस्त्यांवरील खड्डे एक आठवड्यात बुजवून त्याचा अहवाल द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तअभिजित बांगर यांनी दिला.शहरातील रस्त्यावरील खड्ड्यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत आयुक्तांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीला अभिजित बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अमीन अख्तर, अरविंद बाराहाते, नरेश बोरकर, आसाराम बोदिले, विधी अधिकारी व्यंकटेश कपले यांच्यासह सर्व झोनचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.खड्ड्यांचे गांभीर्य विचारात घेता अभिजित बांगर म्हणाले, खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊ शकतात. कुठल्याही रस्त्यांवर खड्डे पडणे आणि ते वेळीच न बुजविणे हे यंत्रणेचे अपयश आहे. पावसाळ्यात रस्त्यांत खड्डे पडूच नये, याची काळजी का घेतली जात नाही, असा सवाल करीत आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पुढील सात दिवसात सर्व खड्डे बुजवून तो अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेडे पुरेशी यंत्रणा आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांचे कामे हाती घेण्याआधी किंवा अन्य कुठलेही नवे काम सुरू करण्याअगोदर जे रस्ते आहेत, त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्राधान्य द्या. मनपाच्या हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून पुढील सात दिवसात खड्डे बुजविणे शक्य नसेल तर नासुप्रच्या हॉट मिक्स प्लान्टची मदत घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले. दिलेल्या मुदतीच्या आत हे काम झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर त्याची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.भांडेवाडी येथेही पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावरही पुनर्भरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर संबंधित विभागांना आपण पत्र पाठविले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. रस्ते खोदल्यानंतर त्याचे पुनर्भरण योग्य होत नसेल तर त्यांना नोटीस देणे आणि ते करून घेण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. त्यामुळे स्वत: अधिकाऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. आधीचे काम पूर्ण झाल्याशिवाय किंवा योग्य पुनर्भरण झाल्याशिवाय नव्याने खड्डे खोदण्याची परवानगी देऊ नये, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.विकासकामुळेही खड्डेबैठकीत उपस्थिती अधिकाऱ्यांनी अन्य विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची माहिती आयुक्तांना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या गोरेवाडा लगतच्या रिंगरोडवर, मेट्रोचे कार्य सुरू असलेला वर्धा रोड, कामठी रोड आणि सेंट्रल एव्हेन्यू रोड तसेच वीज कंपनीचे कार्य सुरू असलेल्या सेंट्रल एव्हेन्यू रोड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्य सुरू असलेल्या पारडी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची माहिती देण्यात आली.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्तAbhijit Bangarअभिजित बांगर