शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सिंचन घोटाळ्यात पाच दोषारोपपत्रे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:46 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत पाच प्रकरणांमध्ये एसीबी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.

ठळक मुद्देहायकोर्टात ‘एसीबी’चे प्रतिज्ञापत्र : नागपूर परिक्षेत्रातील प्रकल्पांच्या चौकशीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत पाच प्रकरणांमध्ये एसीबी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.उच्च न्यायालयात विदर्भातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहेत. त्यात हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने गेल्या आठवड्यात याविषयी आदेश दिला होता. प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्रातील ४० सिंचन कंत्राटांमधील गैरव्यवहाराची चौकशी करणार आहे. त्यात गोसेखुर्द व अन्य १६ प्रकल्पांतील कंत्राटांचा समावेश आहे. यातील चौकशी पूर्ण झालेल्या ९ प्रकरणांमध्ये विशेष सत्र न्यायालयात खटला दाखल करण्याची परवानगी मिळण्याकरिता राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सहा प्रकरणांमध्ये चौकशी पूर्ण झाल्यानंतर सदर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. एसीबी मुख्यालयाला अन्य तीन प्रकरणांत एफआयआर नोंदविण्याची अनुमती मागण्यात आली आहे. गैरव्यवहार नसलेल्या तीन प्रकरणांत क्लोजर रिपोर्ट मंजूर झाला आहे. इतर सात प्रकरणांत क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला असून त्यावर निर्णय व्हायचा आहे.बाजोरिया कन्स्ट्रक्शनकडील कंत्राटात गैरव्यवहारबाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील कंत्राटांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात ३ नोव्हेंबर २०१७ रोजी, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात ६ मार्च २०१८ रोजी, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात १० जुलै २०१८ रोजी तर, भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात १५ आॅक्टोबर २०१८ रोजी एफआयआर नोंदविण्यात आला आहे.अमरावती परिक्षेत्रातील २४ कंत्राटांची खुली चौकशीअमरावती परिक्षेत्रातील २४ कंत्राटांची खुली चौकशी केली जात आहे. त्यातील पेंढारी प्रकल्प (वरुड, जि. अमरावती), वासनी प्रकल्प (अचलपूर, जि. अमरावती), पाचपाहुल प्रकल्प (झरीजामनी, जि. यवतमाळ), महागाव प्रकल्प (दारव्हा, जि. यवतमाळ), कोहान प्रकल्प (नेर, जि. यवतमाळ), बेंबळा प्रकल्प (बाबुळगाव, जि. यवतमाळ) या प्रकल्पांची ९० टक्के तर, वाईसावली प्रकल्प (वाशीम), दाव्हा प्रकल्प (मालेगाव, जि. वाशीम), पळसखेड प्रकल्प (कारंजा, जि. वाशीम), झोडगा प्रकल्प (मानोरा, जि. वाशीम) या प्रकल्पांची ७० टक्के चौकशी पूर्ण झाली आहे. निम्म पैनगंगा प्रकल्पात अनियमितता आढळून आली नसल्यामुळे २४ सप्टेंबर २०१८ रोजी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.अजित पवार यांची विचारपूससिंचन घोटाळ्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विचारपूस करण्यात आली आहे. तसेच, या घोटाळ्यात त्यांची काही भूमिका आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी १ मार्च २०१८ रोजी पाटबंधारे विभागाचे प्रधान सचिवांना पत्र लिहिण्यात आले आहे. न्यायालयात प्रलंबित याचिकांमध्ये पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पवार व माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून बाजोरिया कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पांची कंत्राटे मिळवून दिली असे याचिकांत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प