शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जय श्रीराम अर्बन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:06 IST

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरुद्ध अखेर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे आदेशानंतर पोलीस सक्रियसव्वाचार कोटींचा घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरुद्ध अखेर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुंतवणूकदारांची रक्कम हडपण्याच्या या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी संशयास्पद भूमिका वठविली होती. परिणामी गुंतवणूकदार न्यायालयात गेले आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला.खेमचंद सीतारामजी मेहरपुरे (वय ५८), योगेश मनोहर चरडे (वय ३७) आणि सुनीता केशवराव पोळ (वय ४२), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील मेहरपूरे सोसायटीचे अध्यक्ष, चरडे उपाध्यक्ष तर सुनीता पोळ व्यवस्थापक म्हणून काम करीत होत्या.गणेशनगर कोतवालीतील अग्रगण्य सोसायटी म्हणून जय श्रीराम अर्बन सोसायटीकडे बघितले जात होते. या सोसायटीत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह वेगवेगळया ठिकाणी काम करणारे नोकरदार, टपरीवाले, भाजी, फळ विक्रेते, वाहनचालक गुंतवणूक करीत होते. सोसायटीच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांकडून विविध गुंतवणुकीच्या योजनांचे मृगजळ निर्माण करण्यात आले होते. गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखविले जायचे. त्यामुळे कुणी एफडी, कुणी आरडी तर कुणी दैनंदिन बचतीतून आपल्या घामाची कमाई सोसायटीत जमा केली होती. दोन वर्षांतच या सोसायटीने हजारो गुंतवणूकदार जमविले होते. डिसेंबर २०१६ पर्यंत सोसायटीचे कामकाज सुरळीत होते; मात्र नंतर सोसायटीतील आर्थिक घोटाळ्याची कुजबूज सुरू झाली. ठराविक मुदत भरल्यानंतर गुंतवणूकदार आपली रक्कम परत घेण्यास गेले असता, सोसायटीचे पदाधिकारी आणि अधिकारी त्यांना टाळू लागले. आपली रक्कम आपल्याला परत मिळत नसल्याचे पाहून हळूहळू गुंतवणूकदारांचा रोष वाढत गेला. फेब्रुवारी २०१९ मध्ये यासंबंधाने सोसायटीतील संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर घोटाळ्याची ओरड सुरू झाली. गुंतवणूकदारांनी सोसायटीच्या अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह व्यवस्थापकांवरही आरोप लावत कोतवाली पोलिसांकडे तक्रारी नोंदविल्या; मात्र पोलिसांनी या प्रकरणात संशयास्पद भूमिका वठविली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा रोष आणखीच वाढला. सोसायटीच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर गुंतवणूकदार निदर्शने करू लागले. घेरावही करण्यात आला. पोलीस ठाण्यालाही दोनवेळा संतप्त गुंतवणूकदारांनी घेराव घातला, तरीदेखील पोलिसांनी या प्रकरणात शांतपणा दाखविला.त्यामुळे गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही पक्षाची बाजू समजून घेतल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक खरसान यांनी शनिवारी रात्री या प्रकरणात दिनेश वासुदेवराव पडेगावकर (वय ५५, रा. तुळशीबाग, महाल) यांची तक्रार नोंदवून घेतली आणि सोसायटीचे अध्यक्ष आरोपी खेमचंद मेहरपुरे, उपाध्यक्ष योगेश चरडे आणि व्यवस्थापिका सुनीता पोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.अवैध सावकाराची मुख्य भूमिकासुस्थितीत असलेल्या या सोसायटीतील घोटाळ्यात एका अवैध सावकाराची मुख्य भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे. अध्यक्ष तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांनी अवैध सावकाराला सोसायटीचे दार मोकळे करून दिल्याने त्याने थेट बँक व्यवहारातच ढवळाढवळ सुरू केली. त्याचमुळे या सोसायटीचा आर्थिक ताळेबंद बिघडल्याची ओरड आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी या सोसायटीत ४ कोटी २६ लाख २१ हजार ९६४ रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. घोटाळ्याची रक्कम ध्यानात घेता या प्रकरणाचा तपास गुन्हे आर्थिक शाखेकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Courtन्यायालय