शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

सोलापूरच्या साखर कारखान्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 15:46 IST

ठरलेल्या भावात साखरेचा पुरवठा न करता फसवणूक करणाऱ्या  सोलापूरच्या भीमा सहकार साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांसह तिघांविरुद्ध येथील एका साखर विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे

ठळक मुद्देसाखरेचा व्यवहार झाला कटू एक कोटीच्या फसवणूकीचा आरोप

आॅनलाईन लोकमतनागपूर : ठरलेल्या भावात साखरेचा पुरवठा न करता फसवणूक करणाऱ्या  सोलापूरच्या भीमा सहकार साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांसह तिघांविरुद्ध येथील एका साखर विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. रमेशकुमार गिरधारीलाल जैजानी (वय ६७) असे तक्रारकर्त्या व्यापाऱ्याचे नाव असून, आरोपींनी त्यांच्याकडून एक कोटी रुपये हडपल्याचा आरोप आहे.जैजानी यांनी नंदनवन ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, २० नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांना भीमा सहकारी साखर कारखाना, सोलापूर (ग्रामीण)च्या पदाधिकाऱ्यांनी  संपर्क केला. तुम्हाला आम्ही २४५० रुपये प्रति क्विंटल भावाने १० हजार क्विंटल साखर पुरवू शकतो, अशी यावेळी साखर कारखान्याच्या संचालकांनी आॅफर दिली. त्यानंतर कारखान्याचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ई. जी. सदानंद आणि पार्श्वनाथ एन्टरप्रायजेसचे मालक विनय सनके (रा. शाहू वाडी, कोल्हापूर) यांच्यासोबत सौद्याबाबत प्रदीर्घ बोलणी झाली. करार पक्का झाल्यानंतर जैजानी यांना त्यांनी साखर कारखान्याच्या खात्यात २ कोटी, ४५ लाख रुपये जमा करायला लावले. नंतर मात्र ठरल्याप्रमाणे आरोपींनी जेजानी यांना साखरेचा पुरवठा केला नाही. ठरल्यापेक्षा जास्त भावाने साखर खरेदी करायला सांगितली जात असल्यामुळे जैजानी यांनी नकार दिला. त्यानंतर आरोपींनी त्यांना एक कोटी, ४५ लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित एक कोटी रुपये अद्याप परत केले नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे फसवणूकीची तक्रार नोंदवली. नंदनवन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा