शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:24 IST

कोविड काळात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देमनपा प्रशासनाने नंदनवन पोलिसात केली होती तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड काळात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.मनपा प्रशासनाने गुरुवारी केलेल्या तक्रारीच्या आधारे भादंविच्या कलम १८८, २९० सह कलम आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम २००५ कलम ५१, ५८, सहकलम साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.कोविड अथवा नॉन कोविड रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार रुग्णांकडून रक्कम आकारावी लागते. यासंदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. असे असताना सेव्हन स्टार रुग्णालयाने नॉन कोविड रुग्णांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत ६,८६,५२७ रुपये अधिकचे वसूलले. शासनाच्या नियमांचे पालन खासगी रुग्णालये योग्यप्रकारे करतात की नाही यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले आहे. हे पथक कुठल्याही रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन त्याची पाहणी व तपासणी करतात. सेव्हन स्टार रुग्णालयात या पथकाला अनियमितता आढळली. शिवाय कागदपत्रांची पाहणी केली असता नॉन कोविड रुग्णांकडून अधिकची रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. या आधारे संबंधित रुग्णालयाला तुकाराम मुंढे यांनी नोटिशीद्वारे जाब विचारला होता. मात्र, त्याचेही समाधानकारक उत्तर सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून न मिळाल्याने आयुक्तांनी १८ ऑगस्ट रोजी एक आदेश काढला. रुग्णांकडून अतिरिक्त स्वरूपात आकारलेले ६,८६,५२७ रुपये तात्काळ परत देण्याचे आदेश याद्वारे सेव्हन स्टार हॉस्पिटलला देण्यात आले होते.आदेशाची तात्काळ अंमलबजावणी न केल्यामुळे मनपा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत सेव्हन स्टार हॉस्पिटलविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी अखेर सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापन व इतर सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल