शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगर पोलीस ठाण्यातील लाचखोर शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:09 IST

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी)ने बजाजनगर पोलीस ठाण्यातील नायक शिपायाविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबी कारवाई करणार असल्याचा सुगावा लागताच आरोपी नायक शिपाई प्रफुल्ल पवार फरार झाला. या प्रकरणात अधिकारीही सामील असल्याच्या चर्चेमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी)ने बजाजनगर पोलीस ठाण्यातील नायक शिपायाविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबी कारवाई करणार असल्याचा सुगावा लागताच आरोपी नायक शिपाई प्रफुल्ल पवार फरार झाला. या प्रकरणात अधिकारीही सामील असल्याच्या चर्चेमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.तक्रारकर्त्या युवकाने एका सावकाराकडून बाईक गहाण ठेवून कर्ज घेतले होते. कर्ज आणि व्याज परत केल्यानंतरही बाईक परत न केल्यामुळे तो दुखावला होता. त्याने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने काही दिवसापूर्वी सावकाराच्या घरी जाऊन आपली बाईक परत आली. सावकाराने बजाजनगर पोलिसांकडे बाईक चोरीची तक्रार केली. प्रफुल्लने याचा तपास सुरू केला. तेव्हा त्याला सीसीटीव्हीमध्ये तक्रारकर्ता युवक आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने बाईक घेऊन जाताना दिसून आला. प्रफुल्लने तक्रारकर्त्यास शोधून काढले. त्याला चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तक्रारकर्त्याने प्रफुल्लला सांगितले की, बाईक त्याच्या मालकीची आहे. व्याज व मूळ रक्कम परत केल्यानंतरही अवैध सावकार त्याची बाईक परत करीत नव्हता.ही गोष्ट ऐकल्यानंतरही प्रफुल्लने गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात त्याला ५० हजार रुपये मागितले. युवकाने एसीबीकडे याची तक्रार केली. प्राथमिक चौकशीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. प्रफुल्लला पकडण्यासाठी योजना आखण्यात आली. तीन-चार दिवसांपासून एसीबी प्रफुल्लला पकडण्याच्या तयारीत होते. परंतु त्याला एसीबीच्या कारवाईचा सुगावा लागल्याने तो पैसे घेण्यास मागेपुढे पाहात होता. बुधवारी पुन्हा प्रयत्न केला असता प्रफुल्ल ठाण्यातून पळून गेला. एसीबीने कारवाई केल्याची माहिती होताच ठाण्यात खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत प्रफुल्ल पोलिसांच्या हाती लागला नव्हता. प्रफुल्ल अधिकाऱ्यांचा खूप जवळचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस