शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचार आणि कृतीतून दिला लढा; तुकाराम मुंढे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 20:39 IST

नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी आपण कोरोनामुक्त झाल्याचा संदेश  ट्विट करून दिला आहे. त्यात त्यांनी, आपण सकारात्मक विचार आणि कृतीतून कोरोनाशी लढा दिल्याचे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी आपण कोरोनामुक्त झाल्याचा संदेश  ट्विट करून दिला आहे. त्यात त्यांनी, आपण सकारात्मक विचार आणि कृतीतून कोरोनाशी लढा दिल्याचे म्हटले आहे.त्याचसोबत स्ट्रॉंग विलपॉवर, नेमके व संयुक्त प्रयत्नांचीही त्याला जोड आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.नागपुरात तुकाराम मुंढे यांनी कोरोना रोखण्याच्या संदर्भात अनेक कठोर व तातडीने निर्णय घेतले होते. त्यांनी दररोज शहराची पाहणी करत नियोजनपूर्वक धोरणे राबविली होती. त्यांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांनी गृह विलगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्या दरम्यान त्यांची मुंबईला बदली झाली होती.

तुकाराम मुंढे यांची पोस्ट 

प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी आज कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

नागपूर महानगरपालिकेच्या सात महिन्यांच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळातील साडे पाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. यादरम्यान सर्व प्रोटोकॉल पाळले. मात्र कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. २४ ऑगस्ट रोजी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

शासनाच्या दिशानिर्देशानुसार नियमांचे पालन करत आयसोलेशन पिरियड सुरू झाला. चाचणीचा निकाल आला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे. ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले. समाजातील दुष्प्रवृत्ती आणि कुविचारांवर मात करण्यासाठीसुद्धा या गोष्टी आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली दांडगी इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि ध्येयनिश्चितीच्या जोरावर समाजात सकारात्मकता पसरवावी, हीच सदिच्छा...!

चला, समाजात सकारात्मकता रुजविण्यासाठी समविचारी आणि प्रबळ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊया..!

जय हिंद.. !

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या