शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

Maharashtra Election 2019; मैदानातील प्रचार थांबला तरी सोशल मीडियावर चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 15:53 IST

सोशल मीडियावर वॉच ठेवणारी यंत्रणा सायबर सेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने या नियंत्रणासाठी मदतीला घेतली असली तरी सोशल मीडियावचा छुपा प्रचार मात्र धडाकून सुरू आहे.

ठळक मुद्देमतदारांना येतोय अनुभवप्रचारतोफा थंडावताच कार्यकर्ते सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी संपली. मात्र प्रचारतोफा थंडावताच सोशल मीडियावरून वॉरला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर वॉच ठेवणारी यंत्रणा सायबर सेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने या नियंत्रणासाठी मदतीला घेतली असली तरी सोशल मीडियावचा छुपा प्रचार मात्र धडाकून सुरू आहे.शनिवारी सायंकाळी प्रचार संपला असल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला ३६ तास बाकी उरतात. सोमवारी २१ आॅक्टोबरला मतदान आहे. या मिळालेल्या वेळेचा बहुतेक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारासाठी उपयोग करून घेतल्याचे चित्र आहे. एमएमएस, व्हाईस मॅसेज या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. अनेक उमेदवारांनी ठरविलेले प्रचाराच्या व्हाईस मॅॅसेजचे पॅकेज शनिवारपासून अचानकपणे कार्यरत झाले असून, अनेकांच्या मोबाईलवर या माध्यमातून उमेदवारांचा आवाज पोहचत आहे. यासोबतच व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातूनही आपल्या नेत्याची हवा तयार करणे कार्यकर्त्यांकडून सुरूच आहे.विशेष म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत सोशल मीडियाचा वापर चालणार आहे. यामुळे खुला प्रचार संपला असला तरी छुपा प्रचार मात्र वेगात सुरू झाला आहे. सोशल मीडियावरून सुरू असलेल्या या प्रचाराचा अनुभव अनेक मतदारांना आला आहे.

सायबर सेलकडे यंत्रणाच नाहीया सर्व प्रकारांवर वॉच ठेवणारी सक्षम यंत्रणाच सायबर सेलकडे नसल्याचे दिसत आहे. मोबाईलधारकांची आणि त्याच्या वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामत: सोशल मीडियावरील प्रचाराला आवर घालताना यंत्रणेची दमछाक होत आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया