शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

ऑगस्टमध्ये सणांची रेलचेल, बाजारात खरेदीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:18 IST

यावर्षी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, गौरीपूजन हे सण ऑगस्ट महिन्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरेदीला उधाण येणार आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, गौरीपूजन हे सण ऑगस्ट महिन्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरेदीला उधाण येणार आहे. चार महिन्यांच्या मंदीनंतर ऑगस्ट महिन्यात चांगल्या व्यवसायाची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. एकीकडे कोरोना संसर्गाची भीती आणि दुसरीकडे व्यवसायाची संधी, यावर मात करीत यंदाच्या ऑगस्टमध्ये येणारे सण ‘कॅश’ करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी चालविली आहे.जीवनाला अध्यात्म, भक्तिभावाचा स्पर्श देण्यासाठी सर्वच सण-उत्सवांना देवकल्पना, पौराणिक कथा-कल्पनांची जोड दिली आहे. विशिष्ट देवतेचे अधिष्ठान, श्रद्धा, भक्तिभाव, पूजा, व्रत, नैवेद्य इत्यादींची जोड दिल्यामुळे सण धार्मिक भावनेने, श्रद्धेने साजरे केले जातात. या सणांची व्यापारी आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक वर्षांनंतर हिंदू संस्कृतीत साजरे करण्यात येणारे सहा सण ऑगस्ट महिन्यातच आले आहेत. खाद्यान्नापासून ते नवीन वस्तू खरेदीचे मुहूर्त याच महिन्यात आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्र असो वा इलेक्ट्रॉनिक्स आणि सजावटीच्या वस्तूंच्या बाजारात उत्साहाचे वातावरण राहणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी नवीन उत्पादने आणि योजना आणल्या आहेत. याची तयारी शोरूम संचालकांनी आतापासूनच सुरू केल्याची माहिती व्यावसायिक व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना दिली.गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी, दुचाकी-चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि नवीन घर खरेदीची परंपरा आहे. या निमित्ताने दुकानदारांनी तयारी चालविली आहे. ग्राहकांना खरेदीसाठी फायनान्स कंपन्यांच्या शून्य टक्के योजना आहेत. याशिवाय सणांची खाद्यसंस्कृती आजही भारतीय समाजात चांगलीच मूळ धरून आहे. रक्षाबंधनानिमित्त नामांकित कंपन्यांनी बहिणींना भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंगमध्ये भेटवस्तू आणि चॉकलेट बाजारात आणले आहेत. गणेशोत्सवात सर्वच क्षेत्रातील व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी आहे. त्यात सजावटीच्या वस्तूंपासून खाद्यान्न कंपन्यांना सर्वाधिक व्यवसायाची अपेक्षा आहे.३ ऑगस्ट रक्षाबंधन१२ ऑगस्ट गोकुळाष्टमी१८ ऑगस्ट पोळा२१ ऑगस्ट हरितालिका२२ ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी (गणेश स्थापना)२६ ऑगस्ट गौरीपूजन

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर