शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात खतांच्या किमती कमी हाेणार? कृषीमंत्र्यांना अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 10:28 IST

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची अपेक्षा : ‘लोकमत’ भवनला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खतांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती प्रचंड कमी झालेल्या आहेत. त्या तुलनेत खतांच्या किमती मात्र कमी झालेल्या नाहीत.  खरीप हंगाम सुरू होत आहे. येत्या आठवडाभरात केंद्र सरकार यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे असून, त्यानंतर खतांच्या किमती कमी होतील, असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्री सत्तार हे गुरुवारी नागपुरात होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’ भवनला सदिच्छा भेट दिली. संपादकीय मंडळाशी सविस्तर चर्चा करताना ते म्हणाले,  शेतकरी दोन पिके घेतील तेव्हा ते सक्षम होऊ शकतील.  ज्वारी, बाजरी यासारख्या भरड धान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर संशोधन, शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देणे, तपासणीसाठी फिरती प्रयोग शाळा स्थापन करणे व ते शेतकऱ्यांना परवडले पाहिजे, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गोयल-देशमुख कमिटीचा अहवाल १०० दिवसांतशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या आवश्यक असलेल्या उपाययोजनांसह एकूणच शेतकरी व शेतीच्या विकास तसेच पडीक जमिनीची कुंडली तयार करून ती कशी शेतीयोग्य आणता येईल, या सर्व बाबींवर अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाचे माजी सचिव सुधीरकुमार गोयल आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्या दोन वेगवेगळ्या कमिटी तयार करण्यात आल्या आहेत. ही कमिटी येत्या १०० दिवसांत आपला अहवाल सादर करणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

बियाणे भेसळ कायदा करणार दूध भेसळ कायद्याच्या धर्तीवर राज्यात बियाणे भेसळ कायदा केला जाईल. बियाण्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्याची तरतूद केली जाईल, असेही सत्तार यांनी सांगितले. 

समृद्धी महामार्गालगत पिके घेणार समृद्धी महामार्ग झाला. परंतु त्याच्या दोन्ही बाजूला नुसती ओसाड जमीन दिसून येते. या पडीक जागेवर भाजीपाला किंवा इतर काही पिके घेऊन तसेच शेततळे तयार करून हा संपूर्ण महामार्ग हिरवागार कसा करता येईल, याबाबतही आपला विचार सुरू आहे. महसूल, वन, कृषी, ग्रामविकास एमएसआरडीसी या सर्व विभागांनी मिळून हे करावयाचे आहे. जिल्हा नियोजनाच्या निधीतून येथे काम करण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली आहे.  या रस्त्यावर पोर्ट आहे. मुंबई जवळ आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारMumbaiमुंबईagricultureशेतीFarmerशेतकरी