शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री शक्ती हीच ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचीही प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:26 IST

स्त्री ही आदिशक्ती आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्यांच्या जगनिर्मितीच्या कार्यासाठी प्रेरणा देणारी शक्ती ही स्त्री शक्तीच आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले.

ठळक मुद्देपोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी महिला दिनी केला महिला पत्रकारांचा गौरवस्त्रीने स्वत:शीच स्पर्धा करावी, अकाऊंटंट जनरल शीला जोग यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: स्त्री ही आदिशक्ती आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्यांच्या जगनिर्मितीच्या कार्यासाठी प्रेरणा देणारी शक्ती ही स्त्री शक्तीच आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून इंडियन ऑडिट अ‍ॅन्ड अकाऊंट सर्व्हिसेसच्या अकाऊंट जनरल (२) शीला जोग उपस्थित होत्या. नागपुरातील महिला पत्रकारांना व पत्रकारांच्या अर्धांगिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले.स्त्री ही आदिशक्ती असल्याचे सांगून पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी, स्त्रीच्या ठायी असलेल्या विविध गुणांना विशद केले. स्त्री ही घर व बाहेरची जबाबदारी लीलया सांभाळू शकते, त्यासाठी तिला तिच्या जोडीदाराची साथ व मार्गदर्शनाची गरज असते असे सांगत, आपल्या आईच्या काही हृद्य आठवणीत सर्वांना सहभागी करून घेतले.स्त्रीची स्पर्धा ही जगाशी नसते, ती सहकाऱ्यांशीही नसते, तर ती स्वत:शीच असते व तशीच असावी असे मत शीला जोग यांनी व्यक्त केले. तसे केल्याने तिची प्रगती साधत असते, तिला आपल्या वाटचालीत अग्रेसर होता येत असते असे त्या पुढे म्हणाल्या.या कार्यक्रमात लोकमत समाचारच्या वरिष्ठ उपसंपादक नीता व्यास, लोकमतच्या वरिष्ठ उपसंपादक रुपाली मुधोळकर, दै. भास्करच्या उपसंपादक दीपा भुर्रे, दै. हितवादच्या नितिशा जैन आणि वरिष्ठ पत्रकार बबन वाळके यांच्या पत्नी रंजना वाळके यांना गौरवान्वित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी करून दिला. संचालन वर्षा बाशू तर आभारप्रदर्शन जोसेफ राव यांनी केले. कार्यक्रमास अनेक ज्येष्ठ पत्रकार प्रभृती उपस्थित होते.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन