मिळलेल्या माहितीनुसार, बुधवारी या वनक्षेत्रात गस्तीवर असलेले वनरक्षक व वनकर्मचाऱ्यांना बिबट्याचे शव आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक, सहायक वनसंरक्षक किरण पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन पाताेंडे घटनास्थळी पाेहचले. बिबट्याच्या शरीरावरील झटापटीच्या खुणा दिसून आल्या. यावरून एखाद्या हिंस्र प्राण्याशी झालेल्या झुंजीत तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे घटनास्थळाच्या १००० मीटरच्या परिघात दुसऱ्या प्राण्याच्या अस्तित्वाचा तपास वनकर्मचारी करीत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून रीतसर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पवनी आरएफओ प्रतीक मोडवान, चाेरबाहुली आरएफओ प्रदीप संकपाळ, पेंचचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंडे, पशुधन विकास अधिकारी डाॅ. दत्ता जाधव, यश दाभोळकर, सहदेव टेकाम आदी उपस्थित होते. वनपाल राजीव मेश्राम तसेच वनरक्षक महेश गायकवाड या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.
पेंच वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळली मादी बिबट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:09 IST