शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्रातील महिला परिचर मानधनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:39 IST

राज्य शासनाने आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असणाऱ्या हजारो महिला परिचरांना मानधन देण्यासाठी जुलै २०१९ पर्यंतचे अनुदान राज्यभरातील जिल्हा परिषदांना पाठविले. मात्र, जिल्हा परिषदांनी आलेले अनुदान महिला परिचरांना वितरितच केले नाही. मागील सहा महिन्यांपासून या महिला परिचर मानधनापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून प्रतिक्षा : अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असणाऱ्या हजारो महिला परिचरांना मानधन देण्यासाठी जुलै २०१९ पर्यंतचे अनुदान राज्यभरातील जिल्हा परिषदांना पाठविले. मात्र, जिल्हा परिषदांनी आलेले अनुदान महिला परिचरांना वितरितच केले नाही. मागील सहा महिन्यांपासून या महिला परिचर मानधनापासून वंचित आहेत. राज्यभरातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये एकूण १० हजार ५७९ महिला परिचर कार्यरत आहेत. नागपूर जिल्ह्यातील ३१६ आरोग्य उपकेंद्रांमध्ये ३१६ महिला परिचर कार्यरत आहेत. १२०० रुपये महिना मानधनात त्या काम करतात. कामे खूप आणि मानधन कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य जि.प. महिला परिचर महासंघाने मानधनवाढीसाठी आंदोलने केली. अखेर महासंघाच्या आंदोलनाला यश आले आणि शासनाने १२०० रुपयांच्या मानधनात १८०० रुपयांची वाढ करून १ जानेवारी २०१६ पासून ३००० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागील सहा महिन्यांपासून राज्यभरातील महिला परिचरांच्या खात्यात मानधन जमाच झाले नाही. परिणामी, परिचरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील महिलांना दोन महिन्यांचे, तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. त्यामुळे महासंघाच्या अध्यक्ष मंगला मेश्राम अवर सचिवांना भेटल्या. सचिवांनी जुलै २०१९ पर्यंतचे अनुदान संबंधित जिल्हा परिषदांना पाठविल्याचे सांगून तसे पत्रही मेश्राम यांना दिले. नियमित मानधन देण्यासह वाढीव थकबाकीही देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश अवर सचिवांनी जि.प.ला दिले. मात्र, अनुदान जि.प.च्या खात्यात जमा झाल्यानंतरही जि.प. प्रशासनाने महिला परिचरांना मानधन वितरित केले नाही. यावरून अवर सचिवांच्या पत्राला जि.प.ने केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. जि.प. मानधन का देत नाही, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. तर पुन्हा आंदोलन करूअवर सचिवांनी जि.प.ला अनुदान पाठविले. मात्र, महिला परिचरांना मानधन मागील सहा महिन्यांपासून मिळाले नाही. इतर कर्मचाऱ्यांचा पगार बरोबर होतो. मात्र, निराधार, विधवा, गरीब महिला परिचरांचे मानधन रोखून धरले जाते, हे योग्य नाही. प्रशासनाने त्वरित मानधन न दिल्यास पावसाळी अधिवेशनात पुन्हा आंदोलन करू, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य जि.प. महिला परिचर महासंघाच्या अध्यक्षा मंगला मेश्राम यांनी घेतली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदWomenमहिलाEmployeeकर्मचारी