शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

नैतिक मूल्य घेऊन समर्पित आयुष्य जगणाऱ्यांचा हा सत्कार : न्या.विजय डागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:43 IST

सत्कार हा व्यक्तींचा होत नसून नैतिक मूल्य जोपासून समर्पित आयुष्य जगणाऱ्यांना सन्मानित केले जाते. मूल्य समर्पित आयुष्य जगणारे आज दुर्मिळ झाले आहेत. अशावेळी हे मूल्य जोपासून विविध क्षेत्रात कार्य करीत समाजाला मार्गदर्शक, पथदर्शक ठरलेल्यांचा हा सत्कार आहे. त्यांचा सत्कार समाजाला मूल्याधिष्ठीत जीवनाची प्रेरणा देत राहील, अशी भावना उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विजय डागा यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देज्येष्ठांचा कृतज्ञतेचा सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्कार हा व्यक्तींचा होत नसून नैतिक मूल्य जोपासून समर्पित आयुष्य जगणाऱ्यांना सन्मानित केले जाते. मूल्य समर्पित आयुष्य जगणारे आज दुर्मिळ झाले आहेत. अशावेळी हे मूल्य जोपासून विविध क्षेत्रात कार्य करीत समाजाला मार्गदर्शक, पथदर्शक ठरलेल्यांचा हा सत्कार आहे. त्यांचा सत्कार समाजाला मूल्याधिष्ठीत जीवनाची प्रेरणा देत राहील, अशी भावना उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विजय डागा यांनी व्यक्त केली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी साई सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी खासदार दत्ता मेघे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, बाबुराव तिडके, गिरीश गांधी, प्रफुल्ल गाडगे व्यासपीठावर उपस्थित होते. न्या. विजय डागा पुढे म्हणाले की, सत्कारमूर्तींकडून प्रेरणा घेत अनेकजण कार्य करीत आहेत. त्यांचे सत्कार्य, गुण समाजासाठी पथदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या सीमा साखरे, अरुण मोरघडे, ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर, डॉ. एल. एस. देवानी, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, माजी आमदार यादवराव देवगडे, माजी मंत्री डॉ. मधुकर वासनिक, ताराचंद खांडेकर, श्रीपाद सहस्त्रभोजनी, माजी महापौर अटलबहादूर सिंग, लक्ष्मणराव जोशी, बलबिरसिंग रेणू, रामभाऊ खांडवे, डॉ. हरीश कुळकर्णी, कैलाश अग्रवाल, उमेश शर्मा, वा. रा. गाणार, मदन गडकरी, मधुप पांडेय, केशवराव शेंडे, सलीम बेग, रमेश अंभईकर, गणेश नायडू, शफरुद्दीन साहील, शेख मोहम्मद हाशीम, सत्यनारायण शर्मा, वसंतराव डाखोळे, सिराजुद्दीन हासन, ए. जी. रहेमान, विठ्ठलराव जिभकाटे अशा वेगवेगळ््या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठांचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. स्व. दुगार्दास रक्षक यांचा सत्कार सुपुत्र ज्ञानेश्वर रक्षक यांनी स्वीकारला. सत्कारमूर्तीच्या वतीने लक्ष्मणराव जोशी, बलबीरसिंह रेणू, शफरुद्दीन साहील, वा. रा. गाणार, डॉ. मधुप पांडेय, अटलबहादूर सिंग यांनी भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. बाबुराव तिडके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. श्रीराम काळे यांनी आभार मानले.हिमालयाच्या उंचीच्या मार्गदर्शकांचा सत्कार : बावनकुळेराष्ट्र घडविण्यासाठी प्रथम माणसं घडावी लागतात. आज सन्मानित करण्यात आलेल्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अशा समर्पित लोकांच्या कार्यामुळे या  राष्ट्राची निर्मिती झाली आहे. हिमालयाच्या उंचीच्या या मार्गदर्शकांचा सत्कार समाजाला नवऊर्जा प्रदान करेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :nagpurनागपूर