शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

तंत्रनिकेतनच्या बदली सत्रात प्रवेश प्रभावित होण्याची भीती

By admin | Updated: June 23, 2014 01:15 IST

राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. बदल्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत निकषांची पूर्णत: ‘वाट’

निकष पायदळी : बदल्यांमध्ये घोडाबाजार होत असल्याचा सूरविलास गावंडे - यवतमाळराज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. बदल्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत निकषांची पूर्णत: ‘वाट’ लावली आहे. ऐन प्रवेश प्रक्रिया कालावधीतच बदलीचे सत्र राबविले जात असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. राज्यात असलेल्या ४० ते ४२ शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात सुमारे एक हजार २०० राजपत्रित कर्मचारी कार्यरत आहेत. यात प्राचार्य, विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिले आहे. किमान तीन वर्षे बदली केली जाऊ नये, पती-पत्नी एकत्रिकरणानुसार बदली करावी, मुलगा-मुलगी दहावी किंवा बारावीत शिक्षण घेत असल्यास बदली केली जावू नये, या बाबींचा बदल्या करताना प्रामुख्याने विचार केला जावा, असा नियम करून देण्यात आला आहे. विनंती बदल्यांच्या बाबतीतही काही नियमावली ठरवून देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या सर्व नियमांना बाजूला सारत बदल्या केल्या जात आहेत. सेवानिवृत्तीला दोन ते चार वर्षांचा कालावधी शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्याची बदली करू नये, हा नियमही वेशीवर टांगला गेला आहे. परंतु वशिलेबाजीच्या प्रकारात या सर्व बाबी बाजूला सारल्या जात आहे. यात सदर प्रकारात न मोडणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे. दरवर्षी साधारणत: १०० प्राध्यापक, १० ते १५ विभाग प्रमुख आणि चार ते पाच प्राचार्यांच्या बदल्या होतात. दरम्यान या सर्व लोकांच्या बदल्या नियम डावलून केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.