शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

नागपुरात सोनपापडी कारखान्यावर एफडीएची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:45 IST

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप्त केली.

ठळक मुद्दे बनावट पिस्त्याचा वापर : ४८७३ किलो सोनपापडी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप्त केली.संचालक राजू शिवाजी भुंजे हे सोनपापडी बनविताना पिस्त्याऐवजी हिरवा रंग लावलेले शेंगदाण्याच्या तुकड्यांचा वापर करीत असल्याचे आढळून आले. या सोनपापडीची बाजारात विक्री करण्यात येत होती. हिरव्या रंगाचे शेंगदाण्याचे तुकडे व कृत्रिम हिरवा खाद्यरंग यांचे विश्लेषणास्तव नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. नमुन्याचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या ठिकाणी सोनपापडीच्या लेबलवर घटक पदार्थांमध्ये पिस्ता असल्याचा उल्लेख आढळून आला. प्रत्यक्षात हिरव्या रंगाचे शेंगदाण्याचे तुकडे टाकून ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याने कारवाई करण्यात आली.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्नसुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, अभय देशपांडे आणि प्रफुल्ल टोपले यांनी केली.गैरमार्गाचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करून व्यवसाय करणाºया उत्पादकांविरुद्ध अशाप्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अन्न व्यवसाय चालकांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याअंतर्गत तरतुदी तसेच परिशिष्ट-४ मध्ये नमूद केलेल्या अन्नसुरक्षा प्रणालीचा काटेकोरपणे अवलंब करून व्यवसाय करण्याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत अथवा गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार विभागाकडे करावी, असे शशिकांत केकरे सांगितले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाड