शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुलाच्या भेटीसाठी बापाचा तुटतोय जीव!

By admin | Updated: October 29, 2015 03:08 IST

मानवी चुकीने भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या गीताला तिच्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी देशाची अवघी यंत्रणा धडपडत असताना नागपुरात मात्र सरकारी यंत्रणाच बापलेकाच्या भेटीआड आली आहे.

सरकारी धोरणाचा फटका : बाल कल्याण समितीच नसल्याने वाढल्या अडचणीमंगेश व्यवहारे नागपूरमानवी चुकीने भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या गीताला तिच्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी देशाची अवघी यंत्रणा धडपडत असताना नागपुरात मात्र सरकारी यंत्रणाच बापलेकाच्या भेटीआड आली आहे. शासनाच्या उफराट्या धोरणाचा फटका बापलेकांना सहन करावा लागतो आहे. गीताला जे लाभले तसे नशीब अद्यापतरी या दुर्दैवी बापलेकाच्या वाट्याला आले नाही. बापाचे नाव जल्लालुद्दीन खान असून, तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील दुपेला गावचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे बापाच्या चुकीमुळे १२ वर्षीय रियाजवर ही वेळ आली आहे. जल्लालुद्दीन नागपुरातील पिवळी नदी परिसरातील एका प्लॅस्टिकच्या कारखान्यात काम करीत होता. त्याच्यासोबत मुलगाही तेथेच रहायचा. दीड वर्षांपूर्वी जलालुद्दीन कारखान्यात चोरी करून एकटाच पसार झाला. तेव्हापासून कारखाना मालकाने त्याच्या मुलाला स्वत:च्या ताब्यात ठेवले. बापाचे काम तो मुलाकडून करून घ्यायचा. प्लॅस्टीक वितळविण्याचे धोकादायक काम करताना तो जखमी झाला होता. एकप्रकारे मालकाकडून बापाच्या गुन्ह्याची शिक्षा मुलगा भोगत होता. चाईल्ड लाईनच्या सदस्यांना हा मुलगा आढळला. चाईल्ड लाईनने याची माहिती बाल संरक्षण कक्षाच्या अधिकाऱ्याला दिली. पोलीस आणि बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी मुलाला मालकाच्या ताब्यातून सोडवून घेतले. बाल कामगार अधिनियमानव्ये कारखाना मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. चिमुकल्या रियाजची सुटका करून त्याला बाल संरक्षण कक्षाकडे पोलिसांनी सुपुर्द केले. मुलाच्या पुनर्वसनाची जबाबदारी बाल संरक्षण कक्षाची असल्याने, या कक्षाने मुलाला बालसदनमध्ये ठेवले. संरक्षण कक्षातर्फे त्याच्या पालकाचा शोध घेण्यात आला. उत्तर प्रदेशात असणाऱ्या त्याच्या बापाला सूचना देण्यात आली. दीड वर्षांपासून मुलाची भेट न झाल्याने व्याकुळ झालेल्या बाप दुसऱ्याच दिवशी नागपुरात पोहचला. परंतु सरकारी धोरणामुळे बापलेकाची भेट होऊ शकली नाही.अधिकारीही सांगतात नियमनागपूर : नियमानुसार रेस्क्यू करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे अधिकार केवळ बाल कल्याण समितीला आहेत. परंतु गेल्या महिन्याभरापासून बाल कल्याण समिती कार्यरतच नसल्याने रियाजला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करता येत नाही. त्यामुळे जलालुद्दीन आपल्या मुलाच्या भेटीसाठी सरकारी यंत्रणेचे उंबरठे झिजवितो आहे. प्रशासनातील अधिकारीही नियमाचा हवाला देत बापलेकाची भेट करवून देण्यास हतबल ठरताहेत. बालकांच्या बाबतीत प्रशासन उदासीनकाळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अल्पवयीन बालकांच्या न्याय निवाड्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून बालकल्याण समितीची नियुक्ती करण्यात येते. समितीला न्यायालयाचे अधिकार आहे. नागपूर बालकल्याण समितीच्या कामकाजावर आक्षेप घेऊन महिला व बालकल्याण समितीने ३ आॅगस्टला समितीला बर्खास्त केले. तेव्हापासून बालकांचे प्रश्न सातत्याने प्रलंबित आहेत. या समितीची जबाबदारी विभागाने वर्धा समितीकडे सोपविली होती. परंतु त्यांनीही इन्कार केला होता. त्यामुळे भंडारा समितीला नागपूरचा चार्ज देण्यात आला. परंतु भंडारा समितीनेही चार बैठका घेऊन काम करण्यास नकारात्मकता दर्शविली. त्यामुळे महिनाभरापासून नागपुरात बालकल्याण समितीच नाही. त्यामुळे रियाजसारखी अनेक बालके निरीक्षण गृहात, बालसदनात अडकली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर बैठक घेऊन समितीच्या नियुक्तीचे निर्देश महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे नागपूरसारख्या शहराला समिती मिळाली नाही. जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांशी यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.(प्रतिनिधी) आम्ही हतबल आहोतपीडित बालकांना रेस्क्यू करून त्यांचे पुनर्वसन करणे आमची जबाबदारी आहे. त्यानुसार कारखान्यावर धाड टाकून रियाजला आम्ही ताब्यात घेतले. त्याला पालकांच्या सुपूर्द करण्यासाठी त्याच्या वडिलांचा शोध घेतला. मुलाला कुटुंबापर्यंत सोपविण्यापूर्वी त्याची काळजी आणि संरक्षणासाठी बालसदनमध्ये आम्ही ठेवले आहे. परंतु त्याच्या वडिलांना हस्तांतरित करण्याचे अधिकार केवळ बालकल्याण समितीला आहे. नागपुरात बालकल्याण समितीच नसल्याने आम्ही हतबल ठरतो आहे. आम्हीही बालकल्याण समितीची वाट बघतो आहे, बालकल्याण समितीशिवाय रियाजला त्याच्या वडिलांच्या सुपूर्द करता येणार नाही. - मुश्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी