शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

तीन मुलाच्या बापाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 22:18 IST

तीन मुलाच्या बापाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविल्याची खळबळजनक घटना २३ आॅक्टोबरला काटोल रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देकाटोल रेल्वेस्थानकावरील घटना : लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन मुलाच्या बापाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविल्याची खळबळजनक घटना २३ आॅक्टोबरला काटोल रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.मुकेश पुरुषोत्तम भोसले (३५) असे आरोपीचे नाव आहे. अपहरण केलेली विद्यार्थिनी १६ वर्षांची असून ती वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे आई-वडील मजुरी करतात. त्यांना दोन मुले आणि चार मुली आहेत. तीन मुलींचे लग्न झाले. मोठी मुलगी मध्य प्रदेशात राहते. शाळेला सुट्या असल्यामुळे विद्यार्थिनीला मोठ्या बहिणीच्या घरी जायचे होते. त्यामुळे भाऊजी तिला घ्यायला घरी आले. २३ आॅक्टोबरला दोघेही काटोल रेल्वेस्थानकाकडे निघाले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ते काटोल रेल्वेस्थानकावर पोहोचले. गाडीची प्रतीक्षा करीत असताना लघुशंकेला जाते, असे सांगून विद्यार्थिनी गेली. मात्र, परत आली नाही. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. भावजीने तिचा शोध घेतला परंतु ती कुठेच आढळली नाही. याबाबतची माहिती त्यांनी तिच्या कुटुंबीयांना दिली. आई-वडिलांनी काटोल पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मुलीचे अपहरण करण्यात मुकेशचा हात असावा अशी तिच्या आईवडिलांना शंका आहे. दरम्यान मुकेशही घरी आढळला नसल्यामुळे त्यांची खात्री पटली आहे. मुकेशला तीन मुले आहेत. मुलीच्या आईवडिलांनी मुकेशला फोन करून मुलीला कुठे ठेवल्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आईवडिलांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. लोहमार्ग पोलिसांनी मुकेशला ठाण्यात हजर राहण्याची तंबी दिली. परंतु मुकेशची अरेरावी कायम असून तो ठाण्यात हजर झाला नाही. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणStudentविद्यार्थी