शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण घोटाळ्यातील अपात्र मुख्याध्यापक पुडकेच्या वडिलांना अटक, जामिनावर लगेच सुटका

By योगेश पांडे | Updated: June 10, 2025 23:36 IST

राजश्री शिक्षण संस्थेचा संस्थाचालक चरण चेटुलेला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांनी नानाजी पुडकेला अटक केली.

- योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोगस दस्तावेजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी अपात्र मुख्याध्यापक पराग पुडकेचे वडील नानाजी पुडकेला अटक केली. मात्र तांत्रिक कारणांमुळे लगेच जामिनावर सुटकादेखील करण्यात आली. पुडके संबंधित शिक्षणसंस्थेत सचिव असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी एप्रिल महिन्यात या प्रकरणात राजू केवलराम मेश्राम (५९, अर्जुनी मोरगाव, भंडारा) याला अटक केली होती. तो अर्जुनी मोरगाव येथील पिंपळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत सचिव होता. राजू मेश्रामची ‘लिंक’ बोगस दस्तावेज बनविणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर याच्यासोबत होती. अटक करण्यात आलेला मुख्याध्यापक पराग पुडके याचे वडील नानाजीसोबत राजू मेश्रामची ओळखी होती. आपल्या मुलाचा कुठेतरी जुगाड करायचा आहे असे पुडकेने मेश्रामला सांगितले. तेव्हा मेश्रामने पुडकेची ओळखी महेंद्र म्हैसकरसोबत करवून दिली. त्यानंतर म्हैसकरने पराग पुडकेचे बोगस दस्तावेज तयार केले होते.

या प्रकरणात राजश्री शिक्षण संस्थेचा संस्थाचालक चरण चेटुलेला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांनी नानाजी पुडकेला अटक केली. मात्र तांत्रिक कारणामुळे न्यायालयाने पुडकेची सुटका केली. याविरोधात पोलिसांकडून न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी