शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ची किडनी देऊन वडिलाने दिले मुलाला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 19:21 IST

दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या तरुण मुलाला पित्याने किडनी दान करून जीवनदान दिले. मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या तरुणावर किडनी प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी झाली.

ठळक मुद्दे‘सुपर’ मध्ये २५ वे मूत्रपिंड प्रत्यारोपणराज्यातील पहिले शासकीय रुग्णालय

आॅनलाईन लोकमतनागपूर: दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या तरुण मुलाला पित्याने किडनी दान करून जीवनदान दिले. मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या तरुणावर किडनी प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी झाली.शासकीय रुग्णालयामध्ये सर्वाधिक म्हणजे २५ मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यातील एकमेव रुग्णालय ठरले आहे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत मृत्यूच्या दारात उभ्या २५ जणांना जीवनदान मिळाले.कमलेश गुप्ता (वय ३२) असे मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या तरुणाचे नाव आहे. कमलेशला त्याचे वडील श्यामलाल यांनी आपली किडनी दान केली. मजुरीवर गुजराण करणाऱ्या  श्यामलाल यांचा मुलगा मे महिन्यापासून दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलिसिसवर जगत होता. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने अस्वस्थ झाल्यानंतर कमलेशला कुटुंबीयांनी रुग्णालयात तपासणीसाठी आणले. मे महिन्यात चाचणी केल्यानंतर त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तेव्हापासून कमलेशवर दरमहा डायलिसिसवर उपचार सुरू होते. वडील श्यामलाल यांनी आपली किडनी दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. बुधवारी सुपरच्या टीमने तातडीने पुढाकार घेत कमलेशवर किडनी प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी केली. 

प्रत्यारोपण चमूअधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मधुकर परचंड यांच्या सहकार्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. समीर चौबे, नेफ्रॉलॉजी विभागप्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, युरोलॉजिस्ट डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. विशाल रामटेके, भूलतज्ज्ञ डॉ. विजय श्रोते, मूत्रपिंड प्रत्यारोपण समन्वयक डॉ. मोहम्मद मेहराज शेख यांच्या टीमने ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी केली. रक्त व इतर चाचण्यांसाठी सुपरच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते, डॉ. संजय सोनुने व डॉ. भूषण महाजन यांनीही मदत केली.

टॅग्स :nagpurनागपूर