शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:10 IST

तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलाच्या दिशेने मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्रावर रोडच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना देवलापार परिसरातील पिंडकापार (ता. रामटेक) शिवारात शनिवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देपिंडकापार शिवारातील घटनातेंदूपत्ता संकलनासाठी जाताना चढवला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलाच्या दिशेने मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्रावर रोडच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना देवलापार परिसरातील पिंडकापार (ता. रामटेक) शिवारात शनिवारी सकाळी घडली.बिरसिंग बिरेलाल कोडवते (२८) व विहान बिरसिंग कोडवते (४) अशी गंभीर जखमी असलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. बिरसिंग हे पिंडकापार शिवारातील शेतात असलेल्या घरी राहतात. सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बिरसिंग हे तेंदूपत्ता संकलन व पाने बांधण्यासाठी लागणाऱ्या पानोळ्या आणण्यासाठी जंगलात जात होते. विहानने हट्ट धरल्याने त्यांनी त्यालाही सोबत घेतले आणि एमएच-४०/डीपी-७०१६ क्रमांकाच्या मोटरसायकलने जंगलाच्या दिशेने निघाले.दरम्यान, मध्येच रस्त्याच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे दोघेही दुचाकीसह कोसळले. त्यात वाघाने दोघांवरही पंजाने प्रहार केले. शिवाय, कोसळल्याने विहानच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. वाघाने लगेच पळ काढताच दोघांनीही देवलापार येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. तिथे डॉ. राहुल कोडापे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले आणि नागपूर येथील मेयो रुग्णालयात त्यांना भरती करण्याची व्यवस्था केली. दोघांचीही प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.आर्थिक मदत मिळणार काय?तेंदूपत्ता संकलनाचे काम करणाऱ्या कामगारांना ‘आम आदमी जीवन विमा’ योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी संबंधित कामगाराचे वय हे १८ ते ५९ वर्षांदरम्यान असावे. तो भूमिहीन असावा, असे स्पष्ट केले. मात्र, छोटे शेतकरीदेखील या हंगामात तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात, त्यांचे काय, असा प्रश्नही निमित्ताने उपस्थित होतो. सदर कामगाराचा तेंदूपत्ता तोडताना अपघात झाल्यास त्याला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी दिले असून, तसा आदेश काढला आहे. प्रत्यक्षात अपघात झाल्यानंतरही एकाही कामगाराला लाभ देण्यात आला नाही. तेंदूपत्ता संकलनाला जाताना किंवा परतताना अशी घटना घडल्यास, त्यांना लाभ मिळतो की नाही, हे स्पष्ट केले नाही. या दोन्ही जखमींना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल