शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संवैधानिक आरक्षणासाठी ओबीसींचे साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:14 IST

संवैधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे मंगळवारपासून संविधान चौकात तीन दिवसीय साखळी उपोषण आयोजित केले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : संवैधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे मंगळवारपासून संविधान चौकात तीन दिवसीय साखळी उपोषण आयोजित केले आहे.‘सेव्ह रिझर्व्हेशन, सेव्ह कॉन्स्टिट्युशन, सेव्ह इंडिया’ या बॅनरअंतर्गत करण्यात येत असलेल्या या आंदोलनात अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने आरोप केला की, सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे आरक्षणाला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता संविधानात आरक्षणाची संधी म्हणून तरतूद असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. महासंघाची मागणी आहे की, संपूर्ण देशातील जातींची जनगणना करून लोकसंख्येनुसार सर्व प्रवर्गांना आरक्षण देण्यात यावे. ओबीसींची जनगणना करण्यात यावी. शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करून ‘वन नेशन वन एज्युकेशन’ धोरण राबविण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर मुलामुलींची स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावीत. विद्यार्थ्यांसाठी स्वाधान योजना सुरू करावी, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे. आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष नीलेश कोढे, रोशन कुंभलकर, विनोद हजारे, मयूर वाघ, प्रणव धोटे, चेतन काळे, अक्षय वानखेडे, सौरभ पोटफोडे, पलाश मयोर, उज्ज्वला महल्ले, सोनिया वैद्य, रेणुका धुळस, ऐश्वर्या खोब्रागडे, श्रुती माथुरकर, मनीषा गोटे, पूजा निनावे, अ‍ॅड. रेखा बाराहाते, कल्पना मानकर, नंदा देशमुख, रेखा वहाड, लक्ष्मी सावरकर, शरद वानखेडे, संजय पन्नासे, शकील पटेल, पंकज पांडे, विनोद उलीपवार, पांडुरंग काकडे, गुणेश्वर आरीकर, दिवाकर वर्षे, प्रमोद मून, विकास गौर, रमेश पिसे, निकेश पिने, निकेश ढोके, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील, हरिकिशन हटवार, नरेश वाहणे, मिलिंद फुलझेले आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणagitationआंदोलन