शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

Ganesh Chaturthi 2018; वेगवान व लयबद्ध स्वरांचे अद्भूत संमोहन, संदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 10:35 IST

ज्याला संदल ऐकायला आवडत नाही असा माणूस विदर्भात सापडणार नाही. गणेशोत्सव असो वा नवरात्र, संदलचे पथक असल्याविना त्याला जणू पूर्णत्व येतच नाही. ज्याला नाचता येत नाही वा नाचायलाच आवडत नाही असा मनुष्यही संदल ऐकता ऐकता नकळत पायाचा ठेका देऊ लागतो.

ठळक मुद्देअवघ्या गावाला मिळतो सणासुदीत रोजगार

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ज्याला संदल ऐकायला आवडत नाही असा माणूस विदर्भात सापडणार नाही. गणेशोत्सव असो वा नवरात्र, संदलचे पथक असल्याविना त्याला जणू पूर्णत्व येतच नाही. मुलं-मुली या संदलच्या तालावर बेधुंद होऊन तासनतास नाचू शकतात. एवढेच नाही तर ज्याला नाचता येत नाही वा नाचायलाच आवडत नाही असा मनुष्यही संदल ऐकता ऐकता नकळत पायाचा ठेका देऊ लागतो. असा हा सुरेल, दमदार आणि साधा वाद्यप्रकार विदर्भाचे भूषण ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगावचा संदल हा सर्वात ख्यातीप्राप्त संदल आहे.संदल म्हणजे नेमके कोणते वाद्य?संदल म्हणजे ढोल ताशातील ताशा या वाद्यप्रकाराचाच एक प्रकार. संदलचे मूळ यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभूळगाव हे असल्याचे सांगितले जाते. बाभूळगावचे सय्यद नूरभाई यांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांनी त्याला अभिजात कलेसारखे जपले व वाढवले आहे. या ताशाला लाकूड व छत्रीच्या तारांपासून बनवलेल्या काड्यांनी वाजवले जाते. ताशाला संदलची मंडळी भांडे म्हणतात तर वाजवण्याच्या काड्यांना चोपा वा डंगे म्हणतात. ताशावर पूर्वी चामडे लावले जायचे. आता मोटर वायडिंग पेपर लावला जातो. १०-१२ तरुणांचे गळ््यात ताशा अडकवलेले पथक कोंडाळे करून लाकडाच्या जाड काडीने ताशामधून विविध सुरावटी जेव्हा अतिशय वेगाने काढू लागते तेव्हा ऐकणाऱ्याचे देहभान हरपून जाते.संदलमध्ये वाजविल्या जाणाऱ्या विविध सुरावटीसंदलमध्ये अनेक सुरावटी वाजवल्या जातात. त्यात सर्वात जास्त लोकप्रिय सुरावट आहे बिजली किंवा बारिश. पावसाचे पाणी वेगाने पडत असल्याचा भास यावेळी होतो. कधी ते मंदावते तर लगेचच पुन्हा वेगाने पडू लागते. यासोबतच फटाक्याची लड, शेर, भांगडा, दांडिया, डिस्को, मोहर्रम, नाशिक ढोल, लावणी, काश्मिरी, रेल्वे अशा अनेकविधी सुरावटी वाजवल्या जातात. प्रत्येक सुरावट ही आधी हळू स्वरात सुरू होऊन शेवटी तीव्र होत जाते. त्याचा वेग व आवाज टिपेला पोहचतो तेव्हा थिरकणाऱ्या तरुणाईच्या उत्साह व जोमासोबत त्या

ची स्पर्धा असते.बाभूळगावातील बच्चा बच्चा वाजवू शकतो संदलबाभूळगावातील मुलगा हा त्याच्या आईच्या पोटातूनच ही कला शिकून येतो असे सांगणे आहे सय्यद नूरभाई यांचे. जर त्याला संदल शिकायचाच आहे तर तो काही दिवसातच वाजवणे शिकू शकतो यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. बाभूळगावातील संदलला सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते. थेट दिल्ली, बंगलोरहून बोलावणे येते. या गावातील तरुण मुलांसाठी हे रोजगाराचे एक मोठे माध्यम बनले आहे.बाभूळगावासोबतच धामणगाव, अमरावती या जिल्ह्यांमध्येही संदलचे प्रस्थ वाढते आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८musicसंगीत