वर्धा, दि. 26- इंटरनॅशनल फॅशन डेचे औचित्य साधून वर्धा येथील गांधीग्राम महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'न्यूज पेपर फॅशन विथ व्टिस्ट' अशी थीम ठेवण्यात आली होती. या अंतर्गत लोकमत वृत्तपत्राचे प्रमोशन स्पर्धकांनी आपल्या मॉडेलमधून करायचं होतं. या साठी केवळ लोकमत वृत्तपत्राचाच वापर करून मॉडेलसाठी ड्रेस तयार करण्याची अट घालण्यात आली होती. १४ संघांच्या ७० विद्यार्थ्यांनी या फॅशन स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या डिझाईन मधून सर्वच स्पर्धकांनी लोकमतला हायलाईट करण्याचे काम केले. या कार्यक्रमाला इंदिरा बहुउद्देशिय महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सुनीता शेंडे, रवी शेंडे, बरखा शेंडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परिक्षक म्हणून नागपूरच्या फॅशन डिझायनर प्रिती मालेवार यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले.
वर्ध्यात फॅशन शोच्या रॅम्पवर झळकला लोकमत; 'न्यूज पेपर फॅशन विथ व्टिस्ट' शोची थीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:12 IST
वर्धा, दि. 26- इंटरनॅशनल फॅशन डेचे औचित्य साधून वर्धा येथील गांधीग्राम महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...
वर्ध्यात फॅशन शोच्या रॅम्पवर झळकला लोकमत; 'न्यूज पेपर फॅशन विथ व्टिस्ट' शोची थीम
ठळक मुद्देइंटरनॅशनल फॅशन डेचे औचित्य साधून वर्धा येथील गांधीग्राम महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'न्यूज पेपर फॅशन विथ व्टिस्ट' अशी थीम ठेवण्यात आली होती