ही आहे फसाट; ‘टेक्नोसॅव्ही’ नव्हे परंपरागतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:05 PM2018-07-03T12:05:47+5:302018-07-03T12:06:10+5:30

बियाणे जमिनीत व्यवस्थित झाकले जावे तसेच सरोत्यानंतर जमिनीला पडणाऱ्या खोलगट जागेत पावसाचे पाणी साचू नये, यासाठी ती मातीने सपाट केली जाते. त्यासाठी परंपरागत फसाटीचा वापर केला जातो.

This is Fasat. Traditionally, not 'technosavi' | ही आहे फसाट; ‘टेक्नोसॅव्ही’ नव्हे परंपरागतच

ही आहे फसाट; ‘टेक्नोसॅव्ही’ नव्हे परंपरागतच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शेती क्षेत्रात अजूनही फारशा प्रगत तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला नाही. नागपूरला कपाशी व धान वगळता अन्य पिकांची पेरणी ही बैलजोडीने केली जाते. सोयाबीनची पेरणी केल्यानंतर बियाणे जमिनीत व्यवस्थित झाकले जावे तसेच सरोत्यानंतर जमिनीला पडणाऱ्या खोलगट जागेत पावसाचे पाणी साचू नये, यासाठी ती मातीने सपाट केली जाते. त्यासाठी परंपरागत फसाटीचा वापर केला जातो. ही फसाट झाडांच्या फांद्यांपासून तयार केली जात असून, ती माणसाकरवी ओढून संपूर्ण शेतात फिरविली जाते. याचे काटोल परिसरात टिपलेले हे छायाचित्र. अशी एकरच्या एकर शेते फसाटीने सपाट केली जातात. यात मनुष्यबळाचाच वापर केला जातो. जड फांदीला दिवसेंदिवस मातीवरून ओढून नेणे हे काम सोपे नाही. अधिक पिकाच्या आशेने शेतकरी बांधव हे काम उन्हातान्हाची पर्वा न करता सध्या करताना दिसतात.

 

 

Web Title: This is Fasat. Traditionally, not 'technosavi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती