शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:22 IST

टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकारताना पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत.

ठळक मुद्देराम शिंदे : आंजनगाव शिवारात जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकारताना पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. या पाण्याचा शेतकºयांना शाश्वत सिंचनासाठी वापर करता येईल. ग्रामीण भागात समृद्धी आणण्यासाठी जनतेने जलयुक्त शिवार अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.हिंगणा तालुक्यातील आंजनगाव शिवारातील सिमेंट नाला बंधाºयाचे नुकतेच खोलीकरण करण्यात आले. या जलसाठ्याचे प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते विधीवत जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. समीर मेघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रत्नमाला इरपाते, सुधाकर ढोणे, बबलू गौतम, उपसरपंच अर्चना मरसकोल्हे, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बानू बाकडे, उपसभापती अवचट उपस्थित होते.जलयुक्त शिवार अभियानात हिंगणा तालुक्यातील ५८ गावांची निवड केली असून, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, तलाव बांधकाम व खोलीकरणाची कामे करण्यात आली. त्यामुळे जलसाठे निर्माण झाले असून, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. मात्र, शेतकºयांनी योग्य नियोजन करून पाण्याचा सिंचनासाठी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. वेणा नदीच्या खोलीकरणासाठी १८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, यावर्षी दोन कोटी रुपये मंजूर केले आहे. नदी पुनरुज्जीवनासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्रा. राम शिंदे यांनी दिली. आ. समीर मेघे म्हणाले, आंजनगाव शिवारातील बंधाºयाची गाळामुळे पाणी साठवण क्षमता संपुष्टात आली होती. नाला खोलीकरण व गाळ काढण्यात आल्याने या बंधाºयात ११.७२ टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहेत. शिवाय, विहिरींची पाणी पातळी वाढली आहे, असे सांगत वेणा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी १८ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. मेघे यांनी केली.