शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राधान्य द्यावे : शरणागौडा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:40 IST

शेती करताना शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याची गरज असून कुक्कुटपालन, फळ उत्पादन तसेच डेअरी यासारखे उद्योग करून सामूहिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. शरणागौडा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकेंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे कापूस मेळावा २०१९

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शेती करताना शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याची गरज असून कुक्कुटपालन, फळ उत्पादन तसेच डेअरी यासारखे उद्योग करून सामूहिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. शरणागौडा पाटील यांनी केले.भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित ‘कापूस मेळावा २०१९’ मध्ये ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, कृषी विभागाचे सह संचालक रविंद्र भोसले, कापुस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह, केंद्रीय कापुस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरो उपस्थित होते. डॉ. शरणागौडा पाटील यांनी भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असून त्यापूर्वीच पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. आर. पी. सिंह यांनी जैविक शेतीचे महत्व सांगून सरकारच्या कृषी योजनांची माहिती दिली. रविंद्र भोसले यांनी गटशेतीचे फायदे सांगितले. डॉ. एम. एस. कैरो यांनी खेड्यात शेती विषयक लघु उद्योगाचा विस्तार होण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. शरद निंबाळकर यांनी बी. टी. बियाण्याचा वापर लागवडीसाठी करण्याचे आवाहन केले. मेळाव्यात संस्थेने प्रकाशित केलेल्या माहितीपत्रक, स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कापूस उत्पादनांचे तंत्रज्ञान, गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन, किडनाशकांचा सुरक्षित वापर, कपाशीवरील रोगांचे व्यवस्थापन आदी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी केंद्रीय कापुस संशोधन केंद्राने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे मेळाव्याचे उद्दिष्ट असल्याचे मत व्यक्त केले. आभार डॉ. एस. एम. वासनिक यांनी मानले.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी