शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी थेट शहरात येऊन भाजीपाला विकावा; तुकाराम मुंढे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 21:27 IST

निर्जंतुकीकरणासाठी ३१ मार्चपर्यंत कॉटन मार्केट बंद राहणार असून शेतकऱ्यांनी जवळपासच्या परिसरात जाऊन भाजीपाला विकावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

ठळक मुद्देकॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: निर्जंतुकीकरणासाठी ३१ मार्चपर्यंत कॉटन मार्केट बंद राहणार असून शेतकऱ्यांनी जवळपासच्या परिसरात जाऊन भाजीपाला विकावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सद्यस्थितीत सुरू असलेले लॉकडाऊन लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने नागपुरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना भाजीपाला, दूध, किराणा व औषधी इत्यादी आवश्यक वस्तू घरपोच उपलब्ध व्हाव्यात यासाठी अगोदरच पाऊल उचलले आहे. यासाठी कृषी विभागाच्या मदतीने आजूबाजूच्या खेड्यातील व गावातील शेतकरी आपला भाजीपाला घरोघरी जाऊन ग्राहकांना विकत आहेत. परंतु कॉटन मार्केट हे भाजीपाला विक्रीचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे तेथे फार जास्त प्रमाणात गर्दी होत असल्याचे लक्षात आल्याने सदर मार्केट पुढील तीन दिवस अर्थात ३१ मार्चपर्यंत निर्जंतुककरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तेथे आपला भाजीपाला घेऊन येणाºया शेतकºयांनी आपला भाजीपाला थेट आपल्या वाहनाने घरोघरी जाऊन विकावा. ज्या शेतकºयांना ज्या भागात भाजीपाला विकायचा आहे, त्या भागात विकता येईल. त्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे प्रभारी उपायुक्त महेश मोरोणे (मोबाईल क्र. ९८२३३३०९३२) व बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य (मोबाईल क्र. ९६७३९९६३३२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शहरातील नागरिकांना अविरत सुरू राहावा, हीच यामागची भूमिका आहे. कुठलाही बाजार बंद करणे, हा महानगरपालिकेचा उद्देश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शेतकºयांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक कळविल्यास तो नागरिकांच्या सोयीसाठी प्रकाशित करण्यात येईल, जेणेकरून नागरिक घरपोच सेवेसाठी थेट संपर्क करू शकतील.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCotton Market, Nagpurकॉटन मार्केट