शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीत दीड कोटीचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 05:04 IST

शेतकरी कर्जमाफी योजनेत १ कोटी ४३ लाख १६ हजार ५९६ रुपयाचा घोटाळा केला असा आरोप रोशन बडोले यांनी नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे.

नागपूर : सरकारी अधिकारी व गोंदिया जिल्ह्यातील नोंदणीकृत सावकार यांनी संगनमत करून शेतकरी कर्जमाफी योजनेत १ कोटी ४३ लाख १६ हजार ५९६ रुपयाचा घोटाळा केला असा आरोप रोशन बडोले यांनी नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २९ फेब्रुवारी २०१६ रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. सहकार आयुक्तांकडे योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी कर्जमाफीचे प्रस्ताव पडताळण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्यानंतर संगनमताने हा घोटाळा करण्यात आला असे बडोले यांचे म्हणणे आहे. बडोले यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज सादर करून कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी व शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल्या सावकारांची यादी मागितली होती. त्यातून कर्जमाफी योजनेत घोटाळा झाल्याचे दिसते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकेत सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त, विभागीय आयुक्त, गोंदिया जिल्हाधिकारी आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे.