शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यात शेतकऱ्यांचा माल विक्रीविना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:47 IST

अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देसमितीच्या मनमानीचा असोसिएशनचा आरोप : वेळेची मर्यादा, गाड्या आत सोडल्या नाहीत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, दुचाकींना मार्केट परिसरात प्रवेश करण्यास मनाई होती. शिवाय किरकोळ विक्रेत्यांच्या ३०० तीनचाकी वाहनांना मार्केटमध्ये प्रवेशाला परवानगी होती. पण समितीच्या कर्मचाऱ्यांनी कळमन्याच्या चिखली गेटवर बॅरिकेट्स लावून केवळ ६० ते ७० तीनचाकी आत सोडल्या. किरकोळ विक्रेत्यांना खरेदीसाठी आत न सोडल्याने शेतकऱ्यांचा माल विक्रीविना पडून राहिला. सकाळी ७ वाजता समितीचे कर्मचारी आणि पोलिसांनी बाजार बंद केला. अखेर शेतकऱ्यांना भाज्या गाड्यांमध्ये भरून खुल्या बाजारात विक्रीसाठी न्याव्या लागल्या. कळमन्यात भाजीपाला विक्रीसाठी आणण्याऐवजी खुल्या बाजारातच विक्री केली असती तर बरे झाले असते, अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या, असे गौर म्हणाले.कळमना भाजी बाजार सुरू करताना समितीने बाजाराला तीन परिसरात विभागले असून २०५ अडतियांपैकी एका दिवशी ५० अडतियांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली. खरे पाहता चिखली प्रवेशद्वारापासून भाजी बाजाराचे अंतर अर्धा किमी तर न्यू ग्रेन मार्केटमधील दुसºया बाजाराचे अंतर पाऊण किमी आहे. अनेक किरकोळ विक्रेत्यांना गेटबाहेर गाड्या ठेवून बाजारात पायी जाण्यास सांगितले. त्यामुळे अनेकजण बाजारात गेलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री झाली नाही. समितीने एका अडतियाला दोन गाड्यांमधील भाज्या विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक गाड्या गेटबाहेरून परत पाठविण्यात आल्या. या सर्व घडामोडींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. समितीने योग्यरीत्या नियोजन केल्यास शेतकऱ्यांचा पूर्ण माल विकला जाईल आणि त्यांना आर्थिक फटका बसणार नाही, असे गौर म्हणाले. तीन बाजारात विभागल्या गेलेल्या बाजारापैकी न्यू ग्रेन मार्केटमध्ये पाच अडतियांनी विक्रीसाठी बोलविलेल्या भाज्या विकल्याच नाही. ग्राहक या भागात फिरकलेच नाही. कळमना भाजी बाजाराची वेळ रात्री १ ते सकाळी ७ ऐवजी ९ वाजेपर्यंत वाढवावी, असे गौर म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्याMarketबाजार