शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विकलेल्या कापसाचे शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:21 IST

वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील श्रीकृष्ण जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीला २०१५ मध्ये विकण्यात आलेल्या कापसाचे तब्बल ८ कोटी ९ लाख ७७ हजार ७४८ रुपये शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अरुण वरघने यांच्यासह चार शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : ८ कोटी ९ लाख ७७ हजार रुपये थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील श्रीकृष्ण जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीला २०१५ मध्ये विकण्यात आलेल्या कापसाचे तब्बल ८ कोटी ९ लाख ७७ हजार ७४८ रुपये शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अरुण वरघने यांच्यासह चार शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.शेतकऱ्यांनी श्रीकृष्ण फॅक्टरीला सिंधी रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस विकला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, ते आश्वासन पाळण्यात आले नाही. परिणामी, काही शेतकऱ्यांनी २० जुलै २०१५ रोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून बाजार समितीचे सचिव सुनील टालाटुले यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. समितीवर आता प्रशासक कार्यरत आहे. या घटनेनंतर श्रीकृष्ण फॅक्टरीच्या अनुज्ञप्तीचे बँक गॅरन्टी न घेता नूतनीकरण करण्यात आले होते असे प्रकाशात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे जिल्हा उपनिबंधकांनी थकीत रकमेच्या मूल्यांकनासाठी लवाद स्थापन केला होता. लवादाने ५ डिसेंबर २०१५ रोजी ६ कोटी २३ लाख ३२ हजार ४६६ रुपयांचा व ६ जून २०१६ रोजी १ कोटी ६० लाख ६८ हजार ९१ रुपयांचा वसुली निवाडा जाहीर केला. हे एकूण ८ कोटी ९ लाख ७७ हजार ७४८ रुपये वसूल करण्यासाठी तहसीलदारांनी ८ मार्च २०१६ रोजी श्रीकृष्ण फॅक्टरीच्या मालमत्तेच्या लिलावाची नोटीस प्रकाशित केली होती. त्यासंदर्भात न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असल्याने लिलावाची प्रक्रिया थांबली आहे. यानंतर ३ एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.उत्तर सादर करण्याचा आदेशन्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर गृह विभागाचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे मुख्य सचिव, पणन विभागाचे मुख्य सचिव, श्रीकृष्ण फॅक्टरी, कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी