शहरं
Join us  
Trending Stories
1
जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून
2
खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
3
खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"
4
Anil Ambaniच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, कर्ज फेडण्यासोबतच आता नव्या बिझनेसची तयारी
5
लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी? प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचे प्रयत्न
6
सार्वजनिक आरोग्य विभागाला कागदोपत्रीच पुरविले वाहनचालक; शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
8
Mutual Funds किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवता? SEBI ची 'ही' महत्त्वाची अपडेट जाणून घ्या 
9
लोकसभेचे अध्यक्षपद डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे? नरेंद्र मोदी मित्रपक्षांसोबत करणार सल्लामसलत
10
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
11
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
12
मान्सूनसरींनी व्यापला निम्मा महाराष्ट्र
13
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
14
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद
15
आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’
16
"वर्षभरापूर्वी माझी कारकीर्द संपल्याचे बोलत होते, आता मला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणतात" - जसप्रीत बुमराह
17
मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
18
भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक
19
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
20
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी

पशुधनानेच होणार शेतकऱ्यांचा विकास  : गिरीराज सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 8:52 PM

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : देशात शेतजमिनीच्या तुलनेत उत्पादन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून स्वत:चा विकास करावा आणि उत्पन्न ...

ठळक मुद्देअ‍ॅग्रो व्हिजनमध्ये डेअरी विकासावर कार्यशाळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशात शेतजमिनीच्या तुलनेत उत्पादन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून स्वत:चा विकास करावा आणि उत्पन्न वाढवावे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत निश्चितच वाढ होणार आहे. देशात पशुधन वाढल्यास शेतकरी आणि युवकांच्या रोजगारात वाढ होईल. पशुधनाने शेतकऱ्यांना ३६५ दिवस निश्चितच काम मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पशुधन दुग्ध विकास आणि मत्सपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी येथे केले.अ‍ॅग्रोव्हिजनतर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘विदर्भातील दुग्धोत्पादन आणि प्रक्रिया’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मिश्रा, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत वासनिक, मीरत येथील पशुसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. एन.व्ही. पाटील, पशुसंशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. पी.के. घोष, इंडियन डेअरी असोसिएशनचे चेअरमन डॉ. आर.डी. कोकणे, डॉ. सत्येंदर सिंग आर्य, लक्ष्मीनारायण मिश्रा, सत्राचे समन्वयक डॉ. सी.डी. मायी आणि रवी बोरटकर उपस्थित होते.अ‍ॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकरी आणि नवयुवकांना माहिती देण्याचे नितीन गडकरी यांचे कार्य सर्वोत्तम असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकाचे पॅटर्न बदलवावे. सोबतच पशुधनाचा अवलंब करावा. देशात १.७० दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. ते दरवर्षी वाढत आहे. डेअरीमध्ये २२ टक्के वाटा आहे. कृषी आधारित पशुधन असते तर देशाचा विकास वेगात झाला असता. देशात पशुधनाची निर्यात ७५ ते ८० हजार कोटींची आहे. ती टेक्सटाईल उद्योगापेक्षा दुप्पट आहे. कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योगात कोट्यवधींची गुंतवणूक होणार असल्याचे सीआयआरने म्हटले आहे. ही देशासाठी गौरवाची बाब आहे.दुधासोबत चाऱ्याचे उत्पादन वाढवावे लागेल. शेतकरी आपल्या मुलाला शेतकरी बनविण्यास उत्सुक नाही, ही देशाची शोकांतिका आहे. शेतीचे गुंतवणूक मूल्य कमी झाल्यास लोक शेतीकडे वळतील, असे मत गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले.दिलीप रथ म्हणाले, विदर्भात दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात अ‍ॅग्रोव्हिजनमुळे मोठे परिवर्तन आले आहे. पुढील दोन वर्षात दररोज ३.५ लाख लिटर दूध संकलनाचे मदर डेअरीचे लक्ष्य आहे.प्रास्तविक डॉ. सी.डी. मायी यांनी तर आभार रवी बोरटकर यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्री