लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वायदे बाजारातील 'एनसीडीईएक्स'च्या निझामाबाद येथील हळद भेसळ प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली आहे. वायदे बंद केल्यास हळदीची मूल्य पडताळणी (प्राइस डिस्कव्हरी) संपुष्टात येणार आहे. भविष्यातील दर (फ्यूचर रेट) कळणार नसल्याने शेतकरीदेखील संकटात सापडणार असल्याने हळदीला वायदे बाजाराचे कवच असणे अनिवार्य आहे. एनसीडीईएक्सच्या प्राइस अॅडव्हायझरी कमिटीच्या सदस्यांनी नुकतीच निझामाबाद येथील त्यांच्या गोदामात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या हळदीची तपासणी केली. काही पोत्यांमधील हळदीत भेसळ झाल्याचे निदर्शनास येताच त्यांची तातडीचे चौकशी सुरू केली. सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी याचे भांडवल करीत हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी केली.
या मागणीला शेतकरी उत्पादक कंपन्या व हळद उत्पादकांसोबत गुंतवणूकदार व अनेक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, वायदे सुरू ठेवण्याची मागणी रेटून धरली आहे, सध्या पाच ते सात टक्के हळद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, किमान १० टक्के हळद व्यापाऱ्यांकडे आहे. त्यांनी ती १० गोदामात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या हळदीची तपासणी केली. काही पोत्यांमधील हळदीत भेसळ झाल्याचे निदर्शनास येताच त्यांची तातडीचे चौकशी सुरू केली. सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी याचे भांडवल करीत हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. या मागणीला शेतकरी उत्पादक कंपन्या व हळद उत्पादकांसोबत गुंतवणूकदार व अनेक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, वायदे सुरू ठेवण्याची मागणी रेटून धरली आहे. सध्या पाच ते सात टक्के हळद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, किमान १० टक्के हळद व्यापाऱ्यांकडे आहे. त्यांनी ती १० ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करून गोदामांमध्ये ठेवली आहे. चांगला दर मिळाल्याने यावर्षी महाराष्ट्रासोबतच देशात हळदीचे पेरणी क्षेत्र वाढल्याने उत्पादनही वाढणार आहे.
कुणाचे नुकसान, कुणाचा फायदा?
- वायद्यांवर बंदी घातल्यास हळदीची प्राइस डिस्कव्हरी संपुष्टात येऊन शेतकरी, गुंतवणूकदार, प्रक्रियादार, इतर व्यापारी व निर्यातदारांना फ्यूचर रेट कळणार नाही. त्यांना दराबाबत अंदाज बांधणे कठीण जाईल. ते त्यांचे दरावरील नियंत्रण गमावणार असल्याने या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
- मोजकेच व्यापारी हळदीचे दर नियंत्रणात ठेवतील. ते शेतकऱ्यांकडून कमी दरात हळद खरेदी करीत प्रक्रियादारांना चढ्या दराने विकणार असल्याने त्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
एप्रिलचे दर ऑक्टोबरमध्येमे २०२५ मध्ये सुरू झालेले वायद्यांची मुदत २० ऑगस्ट २०२५ ला संपली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ला एप्रिल २०२६ चे वायदे सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच एप्रिल २०२६ मधील हळदीचे दर ऑक्टोबर २०२५ मध्येच कळणार आहेत. ते वायदे खुले करू नका, अशी मागणी हे व्यापारी करीत असल्याने ते इतरांचा दर निर्णय अधिकार हिरावून घेत आहेत.
सात शेतमालावर बंदीतुरीच्या वायद्यांवर मागील १४ वर्षांपासून बंदी घातली आहे. २० डिसेंबर २०२१ पासून सोयाबीन व सोया कॉम्प्लेक्स, मोहरी व मोहरी कॉम्प्लेक्स त्यानंतर हरभरा, गहू, मूग, बिगर बासमती तांदूळ व कच्च्या पामतेलाच्या वायद्यांवर ३१ मार्च २०२६ पर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे या शेतमालाचे दर वर्षभर दबावात राहण्याचे प्रमाण वाढले आहे.